Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोल्हापुरात यंदाचा नवरात्रोत्सव भाविकांविनाच
Aapli Baatmi October 09, 2020

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव भाविकांविनाच साजरा होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळातील सर्व धार्मिक विधी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार असले तरी दरवर्षीप्रमाणेच नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहे. नवरात्रोत्सवातील अंबाबाईच्या दररोजच्या विविध रूपातील सांलकृत पूजा, पालखी व इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे होणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा – सावधान ! रंकाळ्यावर कुत्री आणताय ?
ते म्हणाले, ‘दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाची तयारी केली जात आहे. मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटीसोबत मंदिराला विद्युत रोषणाईही केली जाणार आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी केले जातील. दरवर्षी नवरात्रोत्सवात रोज दीड लाख भाविक अंबाबाईचे दर्शन घेतात. यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांप्रमाणे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ललितपंचमी, अष्टमी आणि दसरा सोहळ्यासाठी अंबाबाईची पालखी यंदा सजवलेल्या वाहनातून जाणार आहेत.
ललितपंचमीला त्र्यंबोली भेटीला जात असताना पालखी शाहू मिल व टाकाळा येथे परंपरेनुसार थांबते. त्याठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता पालखी वाहनातून खाली उतरवली जाणार नाही. तसेच योग्य ती खबरदारी घेण्याकरिता पालखीच्या आधी दीड दोन तास येथील रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येणार आहेत. वाहनांत फक्त दोन पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. दररोज मंदिर सॅनिटायझरने निर्जुंतुक केले जाणार आहे. तसेच धार्मिक विधीवेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानंतर केला जाणारा महाप्रसादही यंदा रद्द करण्यात आला आहे.’
दरम्यान, नवरात्रोत्सवात गरूड मंडप व देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर विविध भजनी मंडळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. हेही कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत. यावेळी समितीचे शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, मिलिंद घेवारी, सचिव विजय पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा – सीमाभागातील शैक्षणिक संकुलाचे अभ्यासक्रम नव्या वर्षापासून
शहरात दहा ठिकाणी एलईडी स्क्रीन
नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन दरवर्षी लाखो भाविक घेतात. यंदा भाविकांना प्रवेश नसला तरी त्यांना दर्शन घेता यावे याकरिता सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. तसेच शहरातील प्रमुख दहा ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. उभा मारूती चौक, बावडा चौक, राजारामपुरी, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, ताराबाई रोड व मंदिराच्या चारही दरवाज्यांजवळ या स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
दृष्टीक्षेपात
– उत्सवकाळात मणकर्णिका कुंडाचे काम बंद राहणार
– भाविकांना मंदिरात प्रवेश नाही
– मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक विधी
– कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांची कडक अंमलबजावणी
– नगरप्रदक्षिणा व पालखी सजवलेल्या वाहनांतून
संपादन – स्नेहल कदम
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023