Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
विराट-अनुष्काचं बेबी फिल्टर व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एका क्युट जोडीची चर्चा
Aapli Baatmi October 09, 2020
मुंबई- सोशल मिडियावर नेहमीच काही ना काही ट्रेंड होत असतं. सध्या सेलिब्रिटींचे बेबी फिल्टर्स इंटरनेटवर झळकत आहेत. बॉलीवूडचे चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची जोडी आणि त्यांचं बेबी वर्जन बनवून व्हायरल करत आहेत. विराट आणि अनुष्कानंतर आता बॉलीवूडमधल्या आणखी एका प्रसिद्ध जोडीची चर्चा होत असून सोशल मिडियावर या जोडीचे बेबी फिल्टर झळकत आहेत.
हे ही वाचा: अभिनेत्री समंथा अक्किनेनीचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल चाहते म्हणाले, ‘क्वीन…’
अनुष्का आणि विराट आता आई-बाबा होणार आहेत. या दरम्यान त्यांचं बेबी वर्जन सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या जोडीनंतर आणखी एका जोडीचा फोटो समोर आला जो खूपंच क्युट आहे.
Hello cuties! This picture of soon-to-be parents @imVkohli and @AnushkaSharma with baby filter is all things cute! pic.twitter.com/TiiYhVpSk2
— BombayTimes (@bombaytimes) October 8, 2020
भाईजान सलमान खान सोबत त्याची रील लाईफ पार्टनर कतरिना कैफ यांचं बेबी वर्जन आता सोशल मिडियावर धुमाकुळ घालतंय.
अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. सलमानने जवळपास ७ महिन्यांनी शूटींगला सुरुवात केली आहे. सलमान दिशा पटानीसोबत राधेमधील गाण्याचं शूटींग करतोय. तर दुसरीकडे कतरिना कैफसुद्धा शूटींगसाठी बाहेर पडली आहे.
virat kohli anushka sharma salman khan katrina kaif cute baby filter viral
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023