Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
उस्मानाबाद कोरोना : १०९ रुग्णांची भर, सहा बाधितांचा मृत्यू
Aapli Baatmi October 09, 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी १०९ रुग्णांची भर पडली असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्युदर ३.२१ टक्क्यावर गेला आहे. दिवसभरामध्ये २०२ रुग्ण बरे होऊन गेल्याने काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. पण मृत्यूचा दर काही कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्ह्यामध्ये मृत्यु दर दररोज काही अंशानी वाढतच आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के इतका वाढल्याने ही चांगली बाब आहे. सध्या जिल्ह्यात ७ हजार ८७५ एवढे व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर एक हजार १११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. जिल्ह्यामध्ये १०९ रुग्णांची वाढ झाली आहे, त्यामध्ये दहा जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत, तर ८१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच १८ जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. १०९ मध्ये एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील ४९ जणांचा समावेश आहे. त्यात दोन जण आरटीपीसीआरद्वारे व ३८ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. नऊ जणाना इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागन झाल्याची नोंद आहे. परंड्यामध्ये १४ जण बाधित झाले असुन त्यामध्ये अकरा जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंब व वाशीमध्ये प्रत्येकी ११ जणांना कोरोनाची लागन झाली आहे. इतर तालुक्यामध्ये एकेरी आकड्यात संख्या आली असल्याने संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सहा जणांचा मृत्यु
- वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.
- कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला.
- वाशी शहरातील ७५ वर्षीय पुरुष उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.
- तुळजापुर शहरातील माऊली नगर भागातील ५८ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
- तुळजापुर तालुक्यातील जळकोट येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.
- वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील ७९ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.
उमानाबाद कोरोना मीटर
- एकुण रुग्णसंख्या – १३२१८
- बरे झालेले रुग्ण- १०९९५
- उपचाराखालील रुग्ण- १७९९
- एकुण मृत्यु – ४२४
- आजचे बाधित – १०९
- आजचे मृत्यु – ०६
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad corona update news
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023