Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
परभणी : झरी परिसरात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Aapli Baatmi October 09, 2020

झरी (जिल्हा परभणी) : बोंडअळी्च्या संकटानंतर यंदा पुन्हा कपाशीवर लाल्या ( दहिया ) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. झरी (ता. परभणी) शिवारात या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्याण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने याबाबत उपाययोजना सुचविल्या आहेत.
दरवर्षी कपाशीवर नवनवे संकट येत आहे. कधी बोंडअशी तर कधी अतिवृष्टीमुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. गतवर्षीपासून लाल्या रोगाने थैमान घातले आहे. गत हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कपाशी पीक हातातून गेले होते. यंदा देखील पाऊस उशीरापर्यंत सुरु राहील्याने सोयाबीन उत्पादक संकटात आहेत. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी कपाशीवर नवे संकट उभे राहीले आहे. सध्या कपीशीची एक वेचणी झाली असून एकाच वेचणीत कपाशीचा पाला झाल्याने झालेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे. यंदा कपाशीला लाल्या रोगाने ग्रासले आहे. गेल्या आठवड्यापासून सततच्या पावसामुळे कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्याने दुबार पेरणी करूनही बी- बियाणे फवारण्या करूनही कापसाचे क्षेत्र वाढवले, परंतु लाल्याचा प्रादुर्भाव घेतल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. महागडी खते व बी बियाणे आणून खुरपण, वखरणी करून पाच ते सहा फवारण्या झाल्या, शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आता कापसावर होती. परंतु परिसरात लाल्याचा प्रादुर्भाव कापसावर पडल्यामुळे कापूस एका वेचणीतच संपला असे चित्र झरी परिसरात निर्माण झाले आहे.
हेही वाचा – बांगडी विक्रेत्याच्या मुलीचे भन्नाट यश : क्लास न लावता घरी राहून अभ्यास करत मिळवला आयआयटीत प्रवेश –
कृषि विद्यापीठाने सुचविल्या उपाययोजना
सध्या मराठवाड्यात कपाशीवर पडलेल्या लाल्या रोगावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत. कापूस पिकात दहीया रोगाच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रॉबीन + डायफेनोकोनॅझोल १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. तसेच कापूस पिकात आंतरिक बोंड सड याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन २ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. सध्याच्या कोरडया हवामानामूळे कापूस पिकात रसशोषन करणा-या किडींचा (मावा, तुडतूडे, फुलकिड) प्रादुर्भाव दिसून ये असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ५ किंवा फिप्रोनील ५ टक्के ६०० मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ ट्के१६० मिली किंवा बुप्रोफेंझीन २५ टक्के ४०० मिली प्रती एकर पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
खर्चही निघाला नाही
मी दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठा खर्च करुन कपाशीच्या चार बॅग लागवड केली आहे.खत,फवारणी,कोळपणी यावर मोठा खर्च झाला आहे.परंतु गेल्या आठ दिवसापासून कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे होत्याचे नव्हते झाले.एका वेचणीत कापुस संपल्याचे चित्र असून झालेला खर्चही निघाला नाही.
– अनिल वटारे, शेतकरी, झरी.ता परभणी
संपादन – प्रल्हाद कांबळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023