Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोरोना पश्चात उपचारांसाठी नवे केंद्र...मिरज शासकीय रुग्णालयात प्रारंभ : तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक
Aapli Baatmi October 10, 2020

सांगली- कोरोनावर मात केल्यानंतर काही रुग्णांना त्रास होत आहे. त्यांच्यावर काय उपचार करायचे, कुठे करायचे, याबाबत अनेक प्रश्न समोर आले होते. त्यावर उपाय म्हणून मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना पश्चात उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.
कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना पुन्हा काही वेगवेगळे त्रास होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना तपासणे व आवश्यक औषधोपचार करणे गरजेचे ठरते. त्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची मागणी केली जात होती. साहजिकच मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात “पोस्ट कोविड-19 बाह्यरुग्ण विभाग’ या नावाने ते सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर मूर्ती, तसेच उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता भोसले उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, “”शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मार्चपासून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून काम सुरू आहे. या ठिकाणी पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू केले आहे. येथे आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 30 हजारांहून अधिक रुग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. त्यांपैकी कोणालाही काही त्रास होत असल्यास त्यांच्याकरिता सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पोस्ट कोविड ट्रिटमेंट सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार पुढे आणखी दिवसही वाढवला जाऊ शकतो. याचा खूप मोठा फायदा रुग्णांना होईल.”
ते म्हणाले, “”गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. नजीकच्या काळात दसरा, दिवाळी हे सण असल्यामुळे लोकांची हालचाल मोठ्या प्रमाणात होऊन संपर्क वाढून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता आहे. यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, वैयक्तिक स्वच्छता या नियमांचे नियमितपणे पालन करणे याबरोबरच संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी.” दरम्यान, यावेळी कोरोना रुग्णांना गरम जेवण मिळण्याकरिता प्रा. सर्जेराव गायकवाड आणि अरुण दांडेकर यांनी जेवण गरम राखणारी भांडी भेट दिली.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023