Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
महिला अत्याचाराविरोधात गोंदियात निदर्शने; राज्य सरकारचा केला निषेध
Aapli Baatmi October 10, 2020

गोंदिया ः राज्यात अलिकडे महिला, तरुणी व बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. त्यामुळे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आलीत. तसेच विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
सकाळी फिरायला गेलेल्या युवकांचा अपघाती मृत्यू; खरकाडा गावावर शोककळा
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. एवढेच काय तर कोरोना केंद्रात उपचार घत असलेल्या महिलांवरसुद्धा एकटे-दुकटे पाहून अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या असंवेदनशील राज्य सरकारचे या अतिशय गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चाने केला आहे.
टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांना टिकावू शिक्षण; विनोदी वऱ्हाडी बोलीभाषेतून विद्यार्थी होणार साक्षर
भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यालयातून महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदविणारे फलक व झेंडे घेऊन हातात घेऊन तसेच घोषणाबाजी करीत उपविभागीय कार्यालय गाठले. यावेळी जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, प्रदेश सचिव संजय पुराम व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनिल खडतकर यांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये अनेक महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश होता.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023