Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
मुदतवाढ देवूनही गुहागर-विजापूर महामार्गाचे काम अपुर्णच
Aapli Baatmi October 10, 2020

कडेगाव : गुहागर-विजापूर 166 ई या राष्ट्रीय महामार्गाचे काम अडीच वर्षे उलटली तरी अद्याप पुर्ण झाले नसून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.तेव्हा या महामार्गाचे काम तात्काळ पुर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
गुहागर – विजापूर 166 ई या राष्ट्रीय महामार्ग बांधणीचा दोन वर्षांचा कालावधी (डिसेंबर 2019 अखेर) पूर्ण झाला आहे. तरी या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना महामार्ग प्राधिकरणाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.परंतु या कालावधीतही महामार्गाचे काम पूर्ण होवू शकले नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गुहागर-विजापूर या 283 .080 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाला मंजूरी देवून त्यासाठी 1474.89 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती.परंतु महामार्गाचे सध्या सर्वत्र संथपणे काम सुरु आहे.तर अनेक ठिकाणी नव्याने बांधणी केलेल्या महामार्गाच्या बांधकामाला तडे गेले आहेत.तर अनेक ठिकाणी जेथे महामार्गाचे काम पुर्ण झाले आहे.
तेथे वाहनांच्या चाकाचे खोलपर्यंत टायरीचे खड्डे सदृश्य व्रण पडले आहेत.त्यामुळे येथे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रीतीने महामार्गाचे काम मुदतीत काम पूर्ण झालेले नाही. या महामार्गाचे ठराविक किलो मीटरचे टप्पे करुन त्यांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या.यापैकी बहुतेक सर्व टप्प्यामध्ये कामे सुरु झाली.परंतु निविदा प्रसिद्ध झालेनंतर काही महिन्याच्या कालावधीनंतर ही कामे उशिरा सुरु झाली.तर सध्या रस्त्याची कामे सुरु आहेत परंतु त्यामध्ये म्हणावी तेवढी गती नाही.तर जेथे काम सुरु आहे तेथे मोठ्या प्रमाणात रस्ता उकरण्यात आला आहे.
तेथे संबंधित ठेकेदारांकडून नियमित पाणी मारले जात नाही.त्यामुळे तेथून वाहने मार्गक्रमण करताना मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट निर्माण होत आहेत.परिणामी वाहन धारकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.तर अनेक ठिकाणच्या पॅचमध्ये काही किलोमीटर सिमेंटमध्ये रस्त्यांची बांधणी पूर्ण झाली आहे.तेथे अनेक ठिकाणी मार्गात लेवल नाही.त्यामुळे चढ उतार व उंचवटे निर्माण झाले आहेत.तरी संबंधित ठेकेदाराने महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.
कडेगावात महामार्गाचे काम निकृष्ट
गुहागर-विजापूर महामार्ग बांधणीचे काम हे काम सर्वत्र मशिनरीच्या सहाय्याने केले जात आहे.परंतु कडेगाव शहरांत मात्र महामार्ग बांधणीच्या कामात मशिनरीचा वापर केला जात नाही.तर येथे महामार्गाचे बांधणीचे काम हे मजुरांकडून केले जात आहे.त्यामुळे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023