Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा
Aapli Baatmi October 10, 2020

नाशिक / मालेगाव : नैराश्यातून येसगाव खुर्द येथील नानाभाऊ चिंधा शेलार (वय ५२) या शेतकऱ्याने संगीता पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. ९) सकाळी हा प्रकार उघड झाला. गेल्या महिनाभरापासून शेलार बेपत्ता होते.
बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा
५ सप्टेंबरला नानाभाऊ शेलार घरी कोणाला काही न सांगता निघून गेले होते. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलिस ठाण्यात केली. पाटील यांच्या शेतातील मजूर मका कापणी करत असतानाच झाडाला गळफास घेत लटकलेले शेलार त्यांना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. निंबाचे झाड मक्याच्या शेतात असल्याने व मका मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तसेच सलग पाऊस सुरू असल्याने शेताकडे कोणीही फिरकले नाही. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही.
हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना
सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही
आत्महत्येला मोठा कालावधी उलटल्याने उर्वरित मृतदेह कुजल्याचा संशय पोलिस व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शेलार यांची येसगाव खुर्द शिवारात अवघी पावणेदोन एकर जमीन होती. यातील दीड एकर क्षेत्रात द्राक्षे होती. सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच न आल्याने ते हवालदिल झाले होते.
हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023