Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
एकमेकांकडे बोट; बीडकरांची ससेहोलपट
Aapli Baatmi October 10, 2020

बीड : ‘केलेले काम आम्हीच, होत नसलेले त्यांच्यामुळे, मंजुरी आमच्यामुळेच, भ्रष्टाचार त्यांचा, आम्ही कामे आणतो ते अडवितात’, असे नगरपालिकेतील नगराध्यक्ष आणि आमदारांचे दोन गट नेहमीच एकमेकांकडे बोट दाखवितात. पण, उखडलेले रस्ते आणि खड्ड्यांमुळे बीडकरांची ससेहोलपट थांबायला तयार नाही.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
सत्ताधाऱ्यांचे कमी की काय म्हणून अमृत अटल आणि भुयारी गटार योजनांचे काम करणाऱ्या एजन्सीनीही बीडकरांच्या चांगल्याच मुळावर आल्या आहेत. दोन्ही योजनांच्या कामांची मुदत संपली असली तरी कामे अपूर्णच आहेत. विशेष म्हणजे भुयारी गटारसाठी शहरातील अनेक प्रमुख भागांत रस्ते खोदून खड्डे करून ठेवले आहेत. त्यामुळे जागोजागी चिखल आणि घाण झाली आहे. यामुळे रहदारीस तर अडथळा येतच आहे शिवाय घाणीमुळे बीडकरांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिरालाल चौकासमोर अनेक महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवला असून, अद्यापही तो तसाच आहे. पंचशीलनगर भागात जाणाऱ्या रस्त्याचीही हीच अवस्था आहे. एकूणच बीडच्या हितासाठी असलेल्या या दोन्ही योजना अपूर्ण कामांमुळे बीडकरांच्याच मुळावर आल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शहरातील रस्ते खड्डेमय
शहरातील अनेक प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत. नवीन मोंढा, औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. शहरात नव्याने बांधलेल्या अनेक रस्त्यांची हीच अवस्था आहे.
चार दिवसांत पुन्हा सुरू होणार – नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर
शहरातील मंजूर प्रमुख चार रस्त्यांची कामे सुरू झाली. मात्र, आमदारांनी कामे जाणीवपूर्वक अडवून जनतेची दिशाभूल केली. पिंपरगव्हान रोड, हिरालाल चौक, स्वराज्यनगर, अन्य मुख्य रस्त्याची कामे सुरू करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीच आता पुढाकार घेतला असून, चार दिवसांत ही कामे सुरू होतील असे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
गुरुवारी (ता. आठ) नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर, सभापती रवींद्र कदम, सतीश पवार, विकास जोगदंड, मुखीद लाला, गणेश वाघमारे, भास्कर जाधव, सुभाष सपकाळ, राणा चव्हाण आदींनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन शहरातील विविध कामांबाबत चर्चा केली. नगरपालिकेने हाती घेतलेली वरील कामे सुरू केली. मात्र, आमदार संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसोबत येऊन काम अडविल्याचे ते म्हणाले. खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केल्याचेही यावेळी डॉ. क्षीरसागर म्हणाले. नगरपालिकेंतर्गत होणाऱ्या मंजूर रस्त्याचे काम आणि येत्या चार दिवसांत सुरू करणार असून, सदरील कामावर पोलिस संरक्षण देऊन विकासकामांना अडथळा आणणार यावर तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राहुल रेखावार यांनी संपूर्ण माहिती
घेऊन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना तत्काळ संपर्क साधून ही कामे सुरू करा अडथळा आणणार यावर तत्काळ गुन्हे दाखल करा कामे सुरू केल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहणार आहे, कामे करून घेणार आहे आश्वासित केल्याचेही डॉ. क्षीरसागर म्हणाले.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023