Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र संपूर्ण अनलॉक होईल अशी आशा करूयात, राजेश टोपेंचं सूचक विधान
Aapli Baatmi October 10, 2020

मुंबई : मार्च महिन्यापासून लागलेला लॉकडाऊन अजूनही सुरूच आहे. तब्बल सात महिने उलटलेत, राज्याची वाटचाल अनलॉककडे सुरु तर आहे. मात्र अजूनही अनेक निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन या सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, त्याचबरोबर राज्यातील मंदिरांचे दरवाजे कधी खुले होणार, राज्यातील शाळा कधी खुल्या होणार आणि सिनेमागृह तसंच नाट्यगृह कधी खुली होणार हे प्रश्न सर्वसामान्य विचारतायत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अनलॉकबद्दल एक महत्त्वाचं विधान केलंय. राजेश टोपे अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. कोरोनावर लस आलेली नाही. आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. पुढील महिना म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, असं विधान राजेश टोपे यांनी केलंय.
महत्त्वाची बातमी : “तुम्ही OBC मध्ये का येत नाहीत”, विजय वडेट्टीवार यांची संभाजी राजे छत्रपतींना ऑफर
राजेश टोपे म्हणालेत की, येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील मंदिरं, मशिदी आणि सर्वच धार्मिक स्थळं, व्यायामशाळा सुरु केल्या जातील. शाळा देखील सुरु करण्याचा विचार केला जातोय. अशात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा करूयात. मात्र त्यानंतर आपल्याला काही नियम आणि शिस्त पाळावी लागेल. याचीही आठवण राजेश टोपे यांनी करून दिली.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना मृत्युदर कमी करण्याचं मोठं आव्हान सरकार समोर आहे. अशात येत्या काळात महाराष्ट्रातील मृत्युदर कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल असंही राजेश शोते म्हणालेत. राज्य येत्या काळात महाराष्ट्रातील कोरोना मृत्युदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्यासाठी विशेष प्राधान्य देणार आहे असंही राजेश टोपे म्हणालेत.
let us hope that maharashtra will be fully unlockded in november amid corona rajesh tope
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023