Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
निवडणूकांच वाजलं बिगुल : प्राथमिक शिक्षक संघटनेला वेध
Aapli Baatmi October 10, 2020

बेळगाव : गेल्या वर्षी नोंव्हेबर महिन्यात मुदत संपलेल्या प्राथमिक शिक्षक संघटनेची निवडणुक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासुनच इच्छुक शिक्षकांकडुन निवडणुकीबाबत तयारी केली जात आहे. प्राथमिक शिक्षक संघटना सरकार मान्य असल्याने संघटनेवर आपले वर्चस्व रहावे यासाठी प्रगतीपर व गुरु स्पंदन शिक्षक संघ या दोन्ही गटाकडुन वर्चस्वासाठी चढाओढ असणार आहे.
प्राथमिक शिक्षक संघटनेची मुदत नोंव्हेंबर महिन्यात संपल्यानंतर मार्च महिन्यात निवडणुक घेण्यात येणार होती. मात्र त्याच काळात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने वर्षभर निवडणुक लांबल्याने शिक्षक संघटनेच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत येत्या आठ दिवसात निवडणुकीबाबत अंतीम निर्णय होणार आहे. राज्यातील विविध तालुक्यांसह बेळगाव शैक्षणिक जिल्हातील एकुण सात विभागात निवडणुक होणार असुन शैक्षणिक जिल्हात बेळगाव तालुक्यात सरकारी शाळांमधील शिक्षकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. तर सर्वात कमी शिक्षक खानापूर व कित्तुर तालुक्यात आहेत.
हेही वाचा- प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य छत्रपती घराण्याच्या व बहुजनांच्या भावना दुखावणारे –
बेळगाव तालुक्यात 1493 तर शहरात 700 शिक्षक असुन प्रत्येकी 50 शिक्षकांसाठी एक सभासद निवडला जातो. तसेच एकुण जागांपैकी 10 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात. सध्या शाळा बंद असल्याने शिक्षकांना गावात जाऊन विद्यागम योजनेतंर्गत शिकवावे लागत आहे. तरीही अनेक शिक्षकांमधुन लवकरच जाहीर होणाऱ्या संघटनेच्या निवडणुकीकडे लागुन राहीले आहे. 2014 – 15 मध्ये झालेल्या संघटनेच्या निवडणुकीत अतिशय चुरशीने मतदान झाले होते. त्याच प्रमाणे यावेळीही निवडणुकीत चुरस दिसण्याची शक्यता आहे असे मत शिक्षकांमधुन व्यक्त होत आहे.
गेल्या नोंव्हेंबरमध्ये संघटनेची मुदत संपली आहे. त्यानंतर सहा महिन्यात निवडणुक होणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे निवडणुक वेळेत झालेली नाही मात्र 15 नोंव्हेंबरपर्यंत निवडणुक होण्याची शक्यता आहे. निवडणुक वेळेत झाली तर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.
अन्वर लंगोटी, सह शिक्षक, सरकारी मराठी शाळा हलगा
संपादन -अर्चना बनगे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023