Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
रितेश देशमुखने सांगतलं नॉनव्हेज सोडण्याचं कारण, वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रितेश
Aapli Baatmi October 10, 2020

मुंबई-अमिताभ बच्चनचा कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला कर्मवीर एपिसोड ठेवला जातो. ज्यामध्ये समाजसेवीशी संबंधित लोक येतात आणि त्याच स्पर्धकांच्या मदतीसाठी येतात सेलिब्रिटी. याआठवड्याच्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये मोहन फाऊंडेशनशी संबंधित डॉक्टर सुनील श्रॉफ आले होते. डॉ. सुनील यांच्यासोबत रितेश देशमुख देखील पोहोचला.
हे ही वाचा: अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर हल्ला करणा-या शार्पशूटरला अटक
कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये रितेश देशमुखने त्याच्या कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर चर्चा केली. रितेशने वडिल विलासराव देशमुख यांच्या आठवणीत एक भावूक किस्सा शेअर केला. सोबतचं त्याने अंगदान करण्याची इच्छा सांगितली आणि शरिर फिट कसं ठेवता येईल याबाबत सांगितलं. रितेशने या शो दरम्यान सांगितलं की वडिल विलासराव देशमुख यांना कोणत्या तरी अवयवाची कमतरता भासल्याने त्यांना वाचवलं गेलं नाही.
रितेश एका प्रश्नाच्या संदर्भात बोलताना सांगितलं की त्याने नॉनव्हेज खाणं देखील सोडलं आहे. जेव्हा अमिताभ यांनी कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला ‘जेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही अवयव दान करणार आहोत तेव्हा मी नॉनव्हेज खाणं आणि कॉफी हे सगळं बंद केलं जेणेकरुन शरिराचं स्वास्थ्य राखु शकु आणि अंगदान करु शकु.’ रितेशने अमिताभ आणि सुनील श्रॉफ यांच खूप कौतुक केलं. रितेशने सुनील श्रॉफला या शोमध्ये २५ लाख रुपये जिंकण्यासाठी मदत केली. मोहन फाऊंडेशनच्या माध्यमातून ११ हजार ६०० लोकांना अंगदानमुळे आयुष्य मिळालं आहे.
riteish deshmukh have plan to donate organs says on the sets of kbc
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: riteish deshmukh have plan to donate organs says on the sets of kbc
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023