Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Maratha Reservation:ओबीसी आरक्षणाच्या 'ऑफर'वर खासदार संभाजीराजे यांची प्रतिक्रिया
Aapli Baatmi October 10, 2020

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवताना, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये, अशा भूमिकाचा आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुनरुच्चार केला. मराठा आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी साम वाहिनीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह इंटव्ह्यूमध्ये मराठा आरक्षणा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘राजे तुम्ही ओबीसा आरक्षणात या आपण, ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून घेऊ, अशी ऑफर मला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी मोठ्या मनाने मला ही
ऑफर दिली असली तरी, मराठा समाजाला विशेष आर्थिक मागास घटक (एसईबीसी) अंतर्गतच आरक्षण हवे आहे. त्यावर आम्ही सुरुवातीपासून ठाम आहोत आणि आताही ठाम आहोत. आम्हाला ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावायचा नाही.’
मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले होते वडेट्टीवार?
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनौपचारीक चर्चे दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्यापुढे ओबीसी आरक्षणात येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ओबीसीमध्ये अ, ब, क, ड असे प्रवर्ग आहेत. त्यात आणखी एक प्रवर्ग वाढवून घेऊन आरक्षण घ्यावे, असा प्रस्ताव वडेट्टीवार यांनी खासदार संभाजीराजे यांना दिल्याची माहिती स्वतः संभाजीराजे यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
काय म्हणाले संभाजीराजे?
- MPSCपरीक्षा पुढे ढकलण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आमच्या बैठक सुरू होत्या.
- यावेळी ओबीसी नेते देखील मुख्यमंत्र्यांना भेटत होते. एका भेटीत मी आणि विजय वड्डेटिवार बसलो होतो.
- ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करावा यासंदर्भात आम्ही त्यावेळी नकार दिला
- आम्हांला SEBCआरक्षण हव आहे कोणीही आमच्या समाजाची दिशाभूल करू नये.
- आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला देखील धक्का लागता कामा नये ही आमची भूमिका आहे.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023