Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नागपूरकरांनो, कोरोनामृतांचा आकडा होतोय कमी; कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ
Aapli Baatmi October 11, 2020

नागपूर ः जिल्ह्यात कोरोनाचा विळखा काहीसा सैल झाला आहे. दहा दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनामुक्तीत वाढ दिसत असतानाच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी केवळ १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. साडेसहा हजार चाचण्यांतून ६२७ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे कोरोनामुळे दगावलेल्यांचा आकडा २७६७ वर पोहचला आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख १२ हजार ४८१ चाचण्या सात प्रयोगशाळेतून झाल्या आहेत. यातील ८६ हजार ९० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
शनिवारी (ता.१०) मागील २४ तासांत शहरी भागातून ५ हजार ४५२ तर ग्रामीणला १ हजार ८८ अशा एकूण ६ हजार ५४० कोरोना संशयितांच्या नमुन्याची तपासणी केली. यात आरटीपीसीआर आणि रॅपीड अँटिजन चाचण्यांतून शहरातील ४१८, ग्रामीणचे २०१ जण बाधित आढळले. जिल्हाबाहेरील ८ असे एकूण ६२७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले. नागपूर जिल्ह्यात ८३२ जणांनी शनिवारी कारोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७४ हजार ७१७ वर पोहचली आहे.
आजपर्यंत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता ८६.७७ टक्क्यांवर पोहचली आहे. होत असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु ही स्थिती पुढे काही दिवसांपर्यंत कायम राहिल्यास त्यावर ठोस मत व्यक्त करणे शक्य असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार सांगत आहेत. दिवसभरात जिल्ह्यात दगावलेल्या १७ जणांमध्ये शहरातील ७, ग्रामीणचे २, जिल्हाबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील मृत्यूची संख्या १ हजार ९९१, ग्रामीण ४८४, जिल्हाबाहेरील २९२ अशी एकूण २ हजार ७६७ वर पोहचली आहे.
बाधितांचा टक्का १६.७९ टक्के
जिल्ह्यात मागील सात महिन्यांमध्ये ५ लाख १२ हजार ४८१ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यात शहरातील कोरोना बाधितांची संख्या ६७ हजार ६८६, ग्रामीण भागातील १७ हजार ९३० आणि जिल्हाबाहेरील ४७४ अशी एकूण ८६ हजार ९० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आजपर्यंतच्या कोरोनाबाधित अहवालाचे प्रमाण १६.७९ टक्के आहे. तर शनिवारी साडेसहा हजार चाचण्यांमध्ये ६२७ रुग्ण आढळल्याने ९.५८ टक्के प्रमाण होते.
केवळ २,४१८ बाधित रुग्णालयांत
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारावर होती. पंधरा दिवसात पन्नास टक्क्यांनी घट झाली झाली. आता ८ हजार ६०६ रुग्ण जिल्ह्यात उपचाराखाली आहेत. विशेष असे की, यात शहरी भागातील ५ हजार ६७४, ग्रामीणला २ हजार ९३२ रुग्ण आहोत. त्यात मेडिकल, मेयोसह खासगी रुग्णालयात अवघे २ हजार ४१८ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ५ हजार ५६१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
संपादन – अथर्व महांकाळ
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023