Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
रत्नागिरीतील अपघातात तासगावची तरुणी ठार
Aapli Baatmi October 11, 2020

रत्नागिरी – तालुक्यातील करबुडे येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोमल तानाजी सावंत (वय 22, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरूणीचे नाव असून, सूरज संपत पाटील (29, वाघ गल्ली, मांगले, ता. शिराळा) असे जखमी तरूणाचे नाव आहे. अपघात दुपारी साडेबारा वाजता करबुडे फाटा येथे झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, जयसिंगपूरहून (जि. कोल्हापूर) दोघे आज गणपतीपुळे येथे दुचाकीवरून फिरण्यासाठी निघाले होते. निवळी ते गणपतीपुळे असा प्रवास करीत असताना करबुडे फाट्यापासून काही अंतरावर समोरून आलेल्या ट्रकने हुलकावणी दिली. दुचाकीस्वाराला त्याचा अंदाज न आल्याने रस्ता सोडून दुचाकी खाली कोसळली. अपघातात कोमल हिला जबर मार बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सूरज गंभीर जखमी झाला.
हे पण वाचा – अन्यथा भविष्यात बेरोजगार पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील
दरम्यान, या अपघातातील मृत तरुणी जयसिंगपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. ती शेवटच्या वर्षाला होती, तर तरुण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे. पोलिस निरीक्षक सुरेश कदम याचा अधिक तपास करीत आहेत.
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023