Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
बेळगावात कोरोनामुळे 39 शिक्षकांचा मृत्यू
Aapli Baatmi October 11, 2020

बेळगाव : कोरोनामुळे बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 39 शिक्षकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही दिवसेंदिवस कोरोनाची भिती वाढत असुन बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 22 तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 17 शिक्षकांना, कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर मार्च महिन्यापासुन शाळा बंद आहेत. मात्र शिक्षकांना विविध प्रकारची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्यासह विद्यागम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना गावागावात जाऊन शिकवावे लागत आहे.
हेही वाचा – कर्करोग, हृदयरोगासाठी मिळणार आता १५ हजार रुपये
सुरुवातीपासुनच शिक्षकांनी कोरोना काळात शाळा सुरु करु नयेत तसेच शिक्षकांना विमा कवच द्यावे अशी आग्रही मागणी केली होती. मात्र शिक्षण खात्याने सरकारी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत विविध प्रकारच्या प्रशिक्षणाला हजर राहण्याची सुचना केली होती. त्यानुसार शिक्षक प्रशिक्षणला उपस्थित होते. मात्र प्रशिक्षणाबाबत शिक्षकांमधुन तीव्र नाराजीचा सुर उमटत होता. तरीही प्रशिक्षण आणि विद्यागम योजना सुरु ठेवल्यामुळे अनेक शिक्षकांना त्रास सहन करावा लागला असा आरोप शिक्षकांमधुन होत आहे.
शिक्षण खात्याच्या माहितीनुसार एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत बेळगाव जिल्ह्यात सध्या सेवेत कार्यरत असलेल्या एकुण 40 शिक्षकांचा मृत्यु झाला आहे. यापैकी 39 शिक्षक कोरोनाने तर 1 शिक्षकांचा इतर आजाराने मृत्यु झाला. शिक्षण खात्याने मृत्यु झालेल्या शिक्षकांची माहिती संकलीत केली. त्यानुसार बेळगाव शैक्षणिकमध्ये 22 तर चिक्कोडीमध्ये 17 शिक्षकांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही कोरोबाबाबत अधिक प्रमाणात भिती पहावयास मिळत आहे. शिक्षण खात्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
शिक्षण खात्याकडुन आलेल्या सुचनांचे शिक्षकांना पालन करावे लागते. मात्र शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक असुन कोरोनामुळे मृत्यु झाल्यास कोणत्याही प्रकारची अतिरिक्त मदत सरकारकडुन केली जात नाही याची दखल घेत शिक्षकांनी कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हेही वाचा – निवडणूकांच वाजलं बिगुल : प्राथमिक शिक्षक संघटनेला वेध
“बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 39 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील शिक्षकांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. शिक्षकांना सुरुवातीपासुनच कोरोनाबाबत खबरदारी घ्या अशी सुचना करण्यात आली आहे. कोरोनाची लागन होऊ नये यासाठी सर्व शिक्षकांनी काळजी घ्यावी.”
– ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी
संपादन – स्नेहल कदम
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023