Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
फिरण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू, तिघे जखमी
Aapli Baatmi October 11, 2020

वर्धा : जिल्ह्यातील सेवाग्राम परिसरात कारचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले. ते नागपूर जिल्ह्यातील बेला धरणावर फिरायला गेले होते. त्याठिकाणावरून परताना कारचा अपघात झाला असून सेवाग्राम पोलिसांनी याची नोंद घेतली आहे.
अचल रमाकांत पाडे (४४) आणि सुशील मोहन अड्याळकर (३५), असे मृतांची नावे आहेत, तर संतोष सोनछात्रा, जितू चैनाणी, अमोल पालिवाल, अशी जखमींची नावे असल्याची माहिती आहे. अचल पांडे, सुशील अड्याळकर, संतोष सोनछात्रा, जितू चैनाणी आणि अमोल पालिवाल हे पाच मित्र संतोष सोनछात्रा यांच्या मालकीच्या कारने फिरण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील बेला धरणावर गेले होते. येथे दिवसभर भ्रमंती झाल्यानंतर ते परतीला निघाले असता त्यांच्या कारला अपघात झाला. यावेळी कारमधील संतोष सोनछात्रा, जितू चैनाणी, अमोल पालिवाल या तिघांनी गंभीर जखमी असलेल्या अचल पांडे आणि सुशील अड्याळकर या दोघांना मिळालेल्या मदतीच्या आधाराने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two died in car accident in wardha
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023