Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
जुनेखेडच्या सरपंचपदाचे लकी विनर ठरले विशाल कुंभार
Aapli Baatmi October 11, 2020

नवेखेड (सांगली) : जुनेखेड (ता वाळवा) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विशाल कुंभार यांची अनपेक्षितपणे निवड झाली.तांत्रिक अडचणीमुळे ते सरपंच पदाचे लकी विनर ठरले.जुनेखेड येथील ग्रामपंचायतीत तीन वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती.राष्ट्रवादी विरुद्ध हुतात्मा गटाचा टोकाचा संघर्ष असणारी ही ग्रामपंचायत स्थानिक तरुणांनी एकत्र येत बिनविरोध केली होती. दोन्ही गटाच्या गावातील प्रमुख नेत्यांच्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.यावेळी बिनविरोध निवडणुकीत दोन्ही गटाला समान वाटा देण्याचा निर्णय झाला.त्यावेळी सुरवातीची अडीच वर्षे सरपंच पद राष्ट्रवादीला व नंतरची हुतात्मा गटाला असा निर्णय झाला.
सुरवातीला राष्ट्रवादी तर्फे दत्तात्रय गावडे हे सरपंच व नंतरची अडीच वर्षे हुतात्मा चे प्रकाश आंबी हे सरपंच असा निर्णय झाला.निर्णयाची प्रत प्रत्येक ग्रामस्थांना देण्यात आली होती.लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.ठरल्याप्रमाणे सरपंच दत्तात्रय गावडे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला.आता सरपंच होण्याची वेळ प्रकाश आंबी यांची होती.परंतु लोकनियुक्त सरपंच पदाचा कायदा सध्याच्या सरकारने रद्द केला त्यामुळे.आंबी याना लोकनियुक्त म्हणून अर्ज भरता येईना.ते सभा गृहाचे सदस्य नाहीत.त्याच बरोबर कोविड महामारीमुळे सर्वच निवडणूका सध्या बंद आहेत.आशा अनेक अडचणी आल्या.या घोळात हुतात्मा गटाची सरपंच पदाची संधी पुढे पुढे जात होती.त्यावेळी पर्याय म्हणून सभा गृहाचे सदस्य असणारे पशुवैदकीय डॉक्टर विशाल कुंभार यांच्या नावावर सरपंच पदाचा शिक्का मोर्तब झाला.
हेही वाचा- Photo : पुण्याकडील नंदीवाले उदरनिर्वाहसाठी कोल्हापुरात –
कोविड महामारीनंतर.सार्वजनिक निवडणुका सुरू होतील त्या वेळी विशाल कुंभार यांचा सरपंच तसेच सदस्य पदाचा राजीनामा होईल व त्या नंतर प्रकाश आंबी हे पहिल्यादा सदस्य व नंतर सरपंच होतील.असा फॉर्म्युला हुतात्मा गटाच्या नेत्यांनी तयार केला.आज सदस्यांच्या झालेल्या बैठकीत विशाल कुंभार यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.
बिनविरोध जुनेखेड ग्रामपंचायत मध्ये मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.सर्वाना बरोबर घेऊन गावचा कारभार करू.
विशाल कुंभार, सरपंच नवेखेड
संपादन – अर्चना बनगे
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishal Kumbhar elected as Sarpanch of Junekhed Ta Valva Gram Panchayat
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023