Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
जि. प.ने दडवून ठेवल्या शंभर जागा; सर्व खुल्या करण्याची संघटनांची मागणी
Aapli Baatmi October 11, 2020

नागपूर : मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेली विस्थापित व रँडम शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबतची प्रक्रिया जि. प. प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. परंतु, या पदस्थापना देताना समुपदेशन प्रक्रियेत शहरालगतच्या पं. स.अंतर्गत व शिक्षकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या किमान शंभर जागा दडवून ठेवण्यात आल्या. त्यामुळे या प्रक्रियेत पदस्थापनेकरिता पात्र शिक्षकांसाठी सर्व १९० जागा खुल्या करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे.
नवनियुक्त शिक्षक व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना सन २०१८ च्या बदली प्रकियेत विस्थापित व रँडम झालेल्या शिक्षकांना पदस्थापनेच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश ग्रामविकास विभागाकडून ४ सप्टेंबर २०१९ देण्यात आले. नागपूर जि. प.मध्ये अनुसूचित जमातीचे नवनियुक्त ४६ शिक्षक व आंतरजिल्हा बदलीने आलेले ४४ असे एकूण ९० शिक्षकांना पदस्थापना द्यायची असून, या पदस्थापना प्रक्रियेत विस्थापित व रँडम शिक्षकांना संधी द्यायची आहे.
बीईओंच्या समर्थनात एकवटले विस्तार अधिकारी; पदाचा अतिरिक्त प्रभार सोडण्याचा इशारा
त्यानुसार जि. प. प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू केली. परंतु, १९० जागा रिक्त असताना मोक्याच्या शंभर जागा दडवून केवळ ९० जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप शिक्षकांचा आहे. दुर्गम भागातील असल्याने विस्थापित व रँडम शिक्षकांना त्याचा फारसा लाभ होणार नसल्याने ही प्रक्रिया अन्यायकारक ठरणारी असल्याचे शिक्षक संघटनाच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात लीलाधर ठाकरे, दिलीप लंगडे, राजकुमार वैद्य, सुनील पेटकर शरद भांडारकर, टेमराज माले, शुद्धोधन सोनटक्के, लीलाधर सोनावणे, प्रवीण फाळके, दीपक धुडस, तुषार अंजनकर, वीरेंद्र वाघमारे, मनोज घोडके यांचा समावेश होता.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023