Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
जन्मठेप पूर्ण केलेल्या बंदिवानाला मिळालं गाय-वासराचं बळ
Aapli Baatmi October 12, 2020

पुणे : …त्याच्या हातून एक गंभीर गुन्हा घडला होता. न्यायव्यवस्थेने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानेही कारागृहामध्ये शिक्षा पूर्ण केली, त्यानंतर तो तब्बल 21 वर्षांनी कारागृहाबाहेर पडला, पण आता उदरनिर्वाहाचे काय? समाज आपल्याला पुन्हा स्वीकारणार का? हे प्रश्न मनात ठेवूनच त्याने प्रेरणा पथ उपक्रमाच्या कार्यकर्त्यांना पत्र पाठविले. त्यामध्ये त्याने दुग्धोत्पादनासाठी गाईची मागणी केली आणि कार्यकर्त्यांनीही त्याला गायी-वासराचे बळ देत समाजात सन्मानाने जगण्याचा त्याचा मार्ग अखेर मोकळा केला.
– कोंढणपूरच्या शेतकऱ्याला ‘स्वामित्व’चा मान; पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळाली मिळकत पत्रिका
नंदू शंकर पवार नाव त्यांचे. नगरच्या राहुरी तालुक्यातील कनगर गावचे पवार यांच्याकडून काही वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा घडला होता. त्यासाठी त्यांना 21 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली. या घटनेनंतर त्यांची पत्नी अपघातामध्ये गेली, तर दोन मुले मामाच्या घरी सांभाळण्यासाठी गेली. अखेर 16 सप्टेंबर 2020 या दिवशी शिक्षा पूर्ण करून ते कारागृहाबाहेर पडले. पण बाहेर पडून करायचे काय? समाज पुन्हा स्वीकारेल का? असे प्रश्न त्यांना सतावत होते. त्याचवेळी त्यांना भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्यावतीने कारागृहातील बंदिवानांसाठी राबविल्या जाणाऱ्या ‘प्रेरणा पथ’ उपक्रमाची आठवण झाली. त्यानुसार त्यांनी कार्यकर्त्यांकडे पत्र पाठवून त्यांची कैफियत मांडली.
– दरोड्यापाठोपाठ खुनाच्या घटनेला फुटली वाचा; आरोपींनी केला होता मित्राचा खून
सन्मानाने जगू पाहणाऱ्या एका व्यक्तीच्या मागे उभा राहण्याचा निश्चित करीत ‘प्रेरणा पथ’ उपक्रमातर्फे पवार यांना साठ हजार रुपये किमतीची गाय आणि वासरू पवार यांना देण्याचे ठरविले. त्यानुसार, रविवारी शुभारंभ लॉन्स येथे राज्य कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पवार आणि त्यांच्या मुलाकडे जर्सी गाय आणि वासरू सोपविले. यावेळी डॉ. मिलिंद भोई, ऍड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, शकुंतला सातपुते, डॉ. हंसराज डेंबरे, राजेंद्र कदम, सुरेश कोते, भाऊसाहेब करपे, कल्पना भेगडे उपस्थित होते. गाईद्वारे दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणार असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. भोई यांनी केले.
“बंदी आपल्या जीवनाचा नवा अध्याय ‘प्रेरणा पथ’ या उपक्रमामुळे सुरू करत आहे. हा उपक्रम केवळ पुण्यातील एका कारागृह पुरता मर्यादित न ठेवता, तो राज्यभरात राबविता यावा. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर या उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. या स्वरूपाचे चांगले बदल हे समाजात वेगळा आदर्श निर्माण करतात.”
– सुनील रामानंद, अपर पोलिस महासंचालक, राज्य कारागृह विभाग.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023