Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
त्र्यंबकेश्वरमध्ये ७ वर्षांनी गर्द निळ्या कारवीचा बहर; फुलोऱ्यातील औषधी मधाला विशेष महत्त्व
Aapli Baatmi October 12, 2020

नाशिक : गर्द निळ्या आकाशाचे प्रतिबिंब धरतीवर पडावे तसे सध्या त्र्यंबकेश्वरजवळील घाटमाळ कारवीच्या सुंदर फुलांनी नटला आहे. सात वर्षांतून एकदा फुलणारी कारवीच्या या अनोख्या सौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता त्र्यंबकेश्वरकडे वळू लागली आहेत.
दर सात वर्षांनी एकदा बहर
येत्या आठवड्यात कारवीची झुडपे पूर्णपणे फुलांनी झाकली जातील आणि सौंदर्याला नवीन झळाळी मिळेल. नैसर्गिक विविधतेने नटलेल्या घाटात फुलांच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात. साधारणतः कारवीचे चार प्रकार आढळतात. कारवीचे आयुष्यमान चार ते सात वर्षांचे असते. त्यापैकी पहिली सहा वर्षे कारवीचे केवळ झुडपेच असतात. सातव्या वर्षी सप्टेंबरच्या सुमारास कारवीची फुले फुलतात. काही दिवसांतच फुलांमागे फळे येतात. आठव्या वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला फळे फुटतात आणि कारवीच्या जीवनाचे एक चक्र पूर्ण होते. पडलेल्या फळांमधील बिया पुन्हा रुजतात आणि दुसरे जीवनचक्र सुरू होते.
फुलांमधून मधही मिळत असल्याने मध गोळा करणारे कीटकही अशा फुलांकडे आकर्षिले जात आहेत. व्हायटी हा प्रकार दर सात वर्षांनी फुलतो, आकरा याला दर चार वर्षांनी, तर खरवर हा प्रकार तब्बल १६ वर्षांनी फुलतो. अॅकॅन्थेसीया कुटुंबातील स्टॉबीलॅन्झर या प्रजातीत मोडणारी ही वनस्पती आहे. लांब वाढणाऱ्या कारवीच्या काट्या विविध कामांसाठी वापरतात. फुलांमधील मध विशेष प्रसिद्ध आहे. खरवर जातीच्या फुलांमध्ये अधिक प्रमाणात मध मिळते. त्यामुळे मध गोळा करणाऱ्या कीटकांसाठी कारवीचे फुले मेजवानीसारखे असते.
हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
औषधी गुणधर्म
सह्याद्री घाटात ही वनस्पती भरपूर असून, साल्हेर, मुल्हेरसह अनेक गडकिल्ल्यांवर ती मोठ्या प्रमाणात दिसून येते. खोडाची साल वेदनाहारक असून, मुरड्यावर शेकण्यास व लाळ-ग्रंथीच्या दाहयुक्त सुजेवर बाहेरून लावण्यास उपयुक्त असते. फुलांनी जखम भरून येते. आदिवासी ताजी पाने शक्तिवर्धक व ज्वरनाशक म्हणून वापरतात. पण, त्यामुळे पोटात आग होते व उलट्या होऊन त्रास होतो. पाने जनावरांना चारतात. झाडे वरचेवर छाटून त्यानंतर आलेल्या बारीक फांद्या छप्पर व कुडाच्या भिंतीसाठी वापरतात.
हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय ‘आजी’ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023