Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
"बॅगफुल ऑफ लव्ह'ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर उदंड प्रतिसाद
Aapli Baatmi October 12, 2020

सांगली : मध्यमवयीन सख्ख्या शेजाऱ्यांचं सततच भांडण आणि शेवटी त्याचं प्रेमात पडणं.. एका दहा मिनिटांचा लघुपटात मांडला आहे. “बॅगफुल ऑफ लव्ह’ या लघुपटाला हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उदंड प्रतिसाद मिळत आहे. सांगलीतील चिन्मयी भोकरे हिने तो दिग्दर्शित केला आहे. ममता वर्मा आणि गिरीष सहदेव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे लघुपटांना गेल्या काही वर्षात उदंड प्रतिसाद मिळत आहे. नवनव्या कलावंतासाठी ती सुसंधी ठरतेय. सध्याच्या टाळेबंदीत तर हेच चित्रपट प्रदर्शनाचं माध्यम ठरतंय. “हॉटस्टार’ने या लघुपटाची निवड केल्याने चिन्मयीच्या पाठीवर कौतुकाची थापच पडली आहे.
चिन्मयीने यापुर्वी सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वुडस् या दिग्दर्शनाची पदविका घेतली आहे. हा लघुपट तिच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. ये दिल है मुश्किल… कलंक आणि उरी या चित्रपटांसाठी तीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत तीने काही काळ उमेदवारी केली आहे. आता स्वतः चित्रपट निर्मितीच्या तयारीत आहे. या लघुपटासाठी विद्यासागर, तारिक महंमद, सलोनी धात्रक यांचे सहकार्य मिळाले.
संपादन : प्रफुल्ल सुतार
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The overwhelming response to “Bagful of Love” on digital platforms
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023