Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पहाटेचा थरार! जेव्हा गोठ्यात शेळ्याच्या मधोमध जाऊन शांत बसला बिबट्या; बघ्यांनाही फुटला घाम
Aapli Baatmi October 12, 2020

नाशिक : (अंबासन) घरात दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्याने घरी मोजके पाहुणे होते. रविवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यातून जोरात आवाज झाला. गोठ्यातील कोंबड्या आणि शेळ्या इकडेतिकडे बिथरल्या. भामरे यांनी टॉर्चचा आधार घेत गोठ्यात पाऊल ठेवले. अन् समोर जे बघितले त्यांनंतर त्यांना फुटला घाम. ते काय होते नेमके?
अशी आहे घटना
पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील शेतकरी पोपट भामरे यांची गावालगत जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे (गट क्र. १२१) मध्ये शेती आहे. त्यांच्या घरी दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्याने काही मोजके पाहुणे उपस्थित होते. घराच्या भिंतीला लागूनच जनावरे व शेतीपयोगी वस्तूसाठी बंदिस्त गोठा आहे. पहाटे चारच्या सुमारास गोठ्यात जोरजोरात आवाज येत असल्याने शेतकरी पोपट भामरे यांना जाग आली. श्री. भामरे यांनी गोठ्याकडे येत गोठ्याचा दरवाजा उघडताच गोठ्यातील कोंबड्या आणि शेळ्या बाहेर पडल्या. भामरे यांना संशय आल्याने त्यांनी गोठ्यात टॉर्चने पाहिले असता त्यांना गोठ्याच्या कोपऱ्यात दबा धरून बसलेला बिबट्या दिसला. त्यांनी मोठ्या हिंमतीने गोठ्याचा दरवाजा बंद करत ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे यांना संपूर्ण घटना सांगितली.
हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी
काही तासांतच बिबट्या जेरबंद
माहिती मिळताच विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जाळीला लोखंडी पत्रे आडवे करीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आणि काही तासांतच बिबट्या जेरबंद झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे यांच्यासह रूपेश दुसाने, के. आर. बोरसे, पी. आर. परदेशी, आकाश कोळी, अक्षय हेंबाडे, संगीता चौरे, श्रीमती बहिरम, रेणुका आहिरे, वर्षा सोनवणे, दिलीप खेमनार, राजेंद्र साळुंखे, जगन आहिरे, जिभाऊ आहिरे, कैलास पवार, ग्रामसेवक योगेश भामरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023