Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
इस्लामपुरात एकाच दिवसात काढल्या दीडशे तक्रारी निकाली
Aapli Baatmi October 12, 2020

इस्लामपूर : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या पुढाकाराने इस्लामपूर उपविभागात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील प्रलंबित असलेल्या सुमारे दीडशे तक्रारी निकाली काढण्यात पोलिसांना यश आले आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारीची निर्गती करण्याचे काम पोलिसांनी करून दाखवले आहे. श्री. पिंगळे यांनी शनिवारी (ता. 10) या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते.
पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन जास्तीत जास्त तक्रार अर्ज निर्गत करणे, प्रशासन अधिकधिक लोकभिमुख बनविणे, जनतेच्या तक्रारीची दखल घेणे, त्यांचे वेळेत निरसन करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणुक देणे, खोटया, दिशाभूल करणाऱ्या अनेक तक्रारीची शहानिशा करणे, भविष्यात गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, तक्रारीचे वेळीच निरसन करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, हे अत्यंत महत्वाचे कार्य पार पाडले जाते.
तक्रार निवारण दिन विशेष कार्यशाळेचे अनुषंगाने उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह इस्लामपूर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी समक्ष तक्रारदारांच्या तक्रारीचे स्वरुप लक्षात घेवून तात्काळ कारवाई करण्यावर भर दिला. यातून उपविभागातील 150 तक्रार अर्जाची निर्गती करण्यात आली. या तक्रार निवारण दिन कार्यशाळेस अर्जदार व गैरअर्जदार असे एकूण 300 ते 350 लोक हजर होते.
पोलीस ठाणे निहाय निर्गत तक्रारींची संख्या
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय – 8,
इस्लामपूर पोलीस ठाणे – 55,
आष्टा पोलीस ठाणे – 50,
कुरळप पोलीस ठाणे – 9,
कासेगांव पोलीस ठाणेकडील – 4,
शिराळा पोलीस ठाणे – 18,
कोकरुड पोलीस ठाणे – 6.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023