Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा धोका कमीच ! दुसऱ्यांदा कोरोना झालेले राज्यात अवघे 41 रुग्ण
Aapli Baatmi October 12, 2020

सोलापूर : राज्यात आतापर्यंत 15 लाख 37 हजार व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 80 टक्क्यांपर्यंत रुग्णांना कोरोना झाला, परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. आतापर्यंत राज्यातील पावणेतेरा लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एकदा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात ऍन्टीबॉडी तयार होतात. त्यामुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे त्यांना पुन्हा कोरोनाचा धोका कमीच असून आतापर्यंत राज्यातील 41 रुग्णांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.
राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहेत. मात्र, ऑगस्ट- सप्टेंबरच्या तुलनेत आता रुग्णवाढीचा आलेख कमी झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 40 हजार 400 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात को-मॉर्बिड तथा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, एकदा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना 90 दिवसांनंतर कोरोनाचा धोका आहेच. तत्पूर्वी, त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. परंतु, त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असल्याने आणि त्यांच्या शरीरात ऍन्टीबॉडी तयार झाल्याने त्यांना कोरोनाचा धोका कमी असतो. त्या काळात त्यांनी नियमांचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित आहे, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
दुसऱ्यांदा कोरोना झालेल्यांची संख्या खूपच कमी
राज्यात आतापर्यंत 12 लाख 70 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात दुसऱ्यांदा कोरोना झालेल्यांची संख्या नगण्य आहे. राज्यातील खूपच कमी रुग्णांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. मात्र, एकदा कोरोनातून बरे झालेल्यांनी नियमांचे पालन केल्यास त्यांना कोरोनाचा धोका होत नाही.
– प्रदिप आवटे, राज्य साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी
ठळक बाबी…
- कोरोनामुक्त रुग्णांमधील रोगप्रतिकारक क्षमतेमुळे त्यांना पुन्हा कोरोनाचा धोका कमीच
- राज्यातील एकूण रुग्णांपैकी अवघ्या 41 रुग्णांमध्ये पुन्हा आढळली कोरोनाची लक्षणे
- कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये ऍन्टीबॉडी तयार होतात; त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची भिती नाही
- सोशल डिस्टन्सिंगसह मास्क व अन्य नियमांचे तंतोतंत पालन करा अन् कोरोनापासून दूर राहा
- राज्यातील एकूण रुग्णांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत रुग्णांमध्ये नाहीत कोरोनाची लक्षणे तरीही पॉझिटिव्ह
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023