Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
Aapli Baatmi October 12, 2020

पुणे – मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी येत्या मंगळवारी (ता. 13) आणि बुधवारी (ता. 14) तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला. त्यामुळे मध्य महाराष्ट्राला पावसाचा आँरेंज अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते पुढील चोवीस तासांमध्ये तमिळनाडू किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा क्षेत्र तयार होत आहे. तसेच, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुढील चार ते पाच दिवस पावसाच्या दमदार सरी पडतील, असे भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात येत्या सोमवारी (ता. 12) ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. परंतु, त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या दोन्ही ऑरेंज अलर्ट दिला आहे, खात्यातर्फे सांगण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक वातावरण
अरबी समुद्र, गुजरात व मध्यप्रदेशातून परतीच्या मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे लवकरच राज्यातूनही परतीच्या मॉन्सूनचा मुक्काम हलणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोकण व मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून ढगाळ हवामान आहे. मराठवाड्यात पावसाची उघडीप तर विदर्भात पाऊस पडत असल्याची स्थिती आहे. उत्तर भारतात पावसाची उघडीप दिल्याने हवेतील ओलावा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमान कमी-जास्त होत आहे.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हा पाऊस मॉन्सूनचाच
सध्या राज्यात पडत असलेला पाऊस हा मॉन्सूनचा असल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असली तरीही आपल्या राज्यातून तो परत फिरलेला नाही. त्यामुळे सध्या राज्यात मॉन्सून हजेरी लावत असल्याचे सांगण्यात आले.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023