Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
CoronaUpdate : जिल्ह्यात कोरोनाच्या तीन लाख चाचण्या; पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण २८.५४ टक्के
Aapli Baatmi October 12, 2020

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाच्या चाचण्यांनी तीन लाखांचा टप्पा पूर्ण केला असून, सोमवार (ता.१२) पर्यंत ३ लाख ०१ हजार ३९६ रूग्णांचे स्वॅब तपासले आहेत. यापैकी ८६ हजार ००४ रूग्ण पॉझिटीव्ह आले असून, हे प्रमाण २८.५४ टक्के आहे. तर २ लाख १४ हजार ००५ रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, हे प्रमाण ७१ टक्के आहे.
पाचशेपेक्षा कमी बाधित
सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ३८७ अहवाल प्रलंबित होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्या बाधितांची संख्या पाचशेपेक्षा कमी राहिली. नव्याने ४९३ बाधित आढळले असतांना, ७३७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दहा रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा
एकूण बाधितांची संख्या
सोमवारी नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २८०, नाशिक ग्रामीणचे १९१, मालेगावचे अकरा तर जिल्हाबाह्य अकरा रूग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील ३९०, नाशिक ग्रामीणचे २९२, मालेगाव ४८ तर जिल्हाबाह्य सात रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दहा मृतांमध्ये नाशिक शहरातील चार, नाशिक ग्रामीणच्या सहा रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८६ हजार ००४ झाली आहे. यापैकी ७६ हजार ९८५ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, १ हजार ५३३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सद्य स्थितीत ७ हजार ४८६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात ७३२, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात ९०, मालेगाव महापालिका हद्दीत आठ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १६, जिल्हा रूग्णालयात चार संशयित दाखल झाले आहेत.
हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी
स्वॅब चाचण्यांचे महत्त्वाचे टप्पे व बाधितांचे प्रमाण असे–
दिनांक, एकूण चाचण्या, पॉझिटीव्ह, निगेटीव्ह
१७ ऑगस्ट, १,०१,६०४, २५,२८८, ७५,११८
१५ सप्टेंबर, २,००,५८८, ५५,९४०, १,४२,९७८
१२ ऑक्टोबर, ३,०१,३९६, ८६,००४, २,१४,००५
संपादन – रोहित कणसे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023