Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
"आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३५ कोटी ५३ लाखांचा निधी उपलब्ध"- छगन भुजबळ
Aapli Baatmi October 12, 2020

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन निर्देशानुसार २०२०-२१ वर्षासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ३५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.
भुजबळ म्हणाले, की जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२०-२१ साठी पुनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून पाच कोटी १७ लाख, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून एक कोटी आणि जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत सरकारकडून दहा टक्के प्राप्त निधीपैकी २२ लाख ९४ रुपयांचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यान्वित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी
३६ कोटी ११ लाख निधी उपलब्ध
आरोग्य विभागास यापूर्वी मूळ तरतुदीनुसार पाच कोटी ६५ लाख आणि पुनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लाख असा एकूण ३४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढील काळातील कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी ३६ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कार्यान्वित यंत्रणांतर्फे जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने संबंधित यंत्रणांकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगीतले.
हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023