Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पंढरपुरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये तब्बल 23 देशातील प्राध्यापकांचा सहभाग
Aapli Baatmi October 12, 2020

पंढरपूर (सोलापूर) : रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि रिसर्च क्रोनिक्लर जर्नल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वेब-सेमिनारमध्ये 23 देशातील एकूण 1740 हून अधिक अभ्यासकांनी सहभाग नोंदविला आहे. स्वायत्त महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रतिसाद मिळाला आहे.
‘लांग्वेज, लिटरेचर, कल्चर अँड प्यान्डेमिक’ या विषयावर संपन्न झालेल्या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन कॉनडा येथील टोरांटो विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. जेराल्ड कपचीक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते. बीजभाषणात डॉ. जेराल्ड कपचिक म्हणाले की, कोरोना महामारी ही निसर्गाने माणसाला आत्मपरीक्षण करण्यासाठी दिलेली एक संधी आहे. कोरोनाच्या संकटामुळे मानवी संस्कृतीपुढे बिकट आव्हान निर्माण केली आहे. या प्रसंगी शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असून त्यांनी या संधीचा उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी. या आव्हानात्मक काळामध्ये माणसाने माणसाशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुसंवाद साधने गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, कोरोनाची महामारी ही जागतिक स्वरूपाची असली तरी याकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पहिले पाहिजे. कोरोनामुळे समाज जीवनात निर्माण झालेली ही भीती दूर करण्यासाठी व लोकांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी साहित्यिकांनी लिहिणे गरजेचे आहे. त्यांनी कोरोनाच्या आपत्तीमध्ये मानवीमूल्ये टिकवून ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली पाहिजे.
या वेबिनारच्या प्रथम सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय लॉयंस विद्यापीठ (तैवान) येथील डॉ. यांशांग चुंग यांनी तैवानमधील इंग्रजी भाषाविषयक संशोधन आणि शिक्षण यावर विस्तृतपणे मांडणी केली. तसेच त्यांच्या विद्यापीठात सुरु असलेल्या भाषिक प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी संशोधकांना केले. तैवान येथील कोशियांग नॉर्मल विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. स्टीफन ओहलंडर यांनी इंग्रजी साहित्याचे ऐतिहासिक आणि चरित्रात्मक विश्लेषण केले. दुसऱ्या सत्रामध्ये इंदोर येथील देवी अहिल्या विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अशोक सचदेव यांनी सद्यस्थिती आणि इंग्रजी भाषा यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. या काळात इंग्रजी भाषेमध्ये विविध शब्दांची भर पडत असून यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या सत्राचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठातील इंग्रजीचे प्रोफेसर व माजी विभागप्रमुख डॉ. शिवाजी सरगर यांनी या काळातील साहित्य क्षेत्रामधील आव्हाने तसेच संशोधनाची गरज यावर भाष्य केले.
या वेबिनारचे समन्वयक डॉ. समाधान माने यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय करून दिला. हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील इंग्रजीचे माजी विभागप्रमुख व रिसर्च क्रोनिक्लर या आंतरराष्ट्रीय जर्नलचे मुख्य संपादक प्रोफेसर डॉ. शिवाजी सरगर, उप-प्राचार्य आणि इंग्रजी विभागप्रमुख प्रा. चंद्रकांत रासकर तसेच प्रा. सुहास शिंदे, प्रा. परमेश्वर दुधाळ, रुसाचे समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ. अमर कांबळे, डॉ. रमेश शिंदे, ऑफिस प्रमुख अनंता जाधव आणि प्रा. राजेंद्र मोरे यांचे सहकार्य लाभले. आभार प्रा. धनंजय वागदरे यांनी मानले.
संपादन : वैभव गाढवे
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Participation of professors from 23 international countries in the webinar of Karmaveer College in Pandharpur
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023