Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
विक्रेत्यांचा मद्यसाठा तपासणार
Aapli Baatmi October 12, 2020

नागपूर : मद्य विक्रेत्यांच्या दुकानातील साठा तपासण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी दिली. लॉकडाउनच्या काळात १२ वर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून यातील काहींचे परवाने निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
साधारणतः मार्च महिन्यात मद्यविक्री परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रीया सुरू होते. त्यासाठी लागणाला अवधी अनिश्चित असते. स्टॉक कमी पडू नये यासाठी विक्रेते अधिकचा साठा करून ठेवतात. याशिवाय त्याच दरम्यान मद्याची दरवाढही संभावते. यामुळे साठा अधिकच वाढविला जातो. बरेचदा सहा महिने ते वर्षभर लागेल येवढा साठा बरेच विक्रेते करून ठेवतात. यंदा मार्चच्या मध्यातच मद्यविक्री बंद करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्टॉकची नोंदणी करून ठेवली. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लॉकडाऊनमध्ये उपराजधानीत सर्रास मद्यविक्री झाली.
सरकारचा आरक्षणाला खो…, अनुकंपाधारकांना फटका
मूळ किमतीपेक्षा पाचपट अधिक शुल्काची आकारणी केली गेली. मद्यविक्री सुरू करण्याची घोषणा होताच साठा पुन्हा स्टॉक चेक करण्याच्या सूचना मिळाल्या. पण, उपलब्ध मनुष्यबळ आणि मद्यविक्री दुकानांची संख्या लक्षात घेता स्टॉकचे मोजमाप अशक्य होते. बऱ्याच ठिकाणी स्टॉकची तपासणी केवळ कागदावरचे रकाने भरण्यापूरतीच मर्यादित राहिली. अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या नावाखाली केवळ खानापूर्ती केल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी याबाबतचा आढावा घेतला. तसेच साठा तपासणी करण्याच्या सूचना केल्या.
अधिकाऱ्यांवर कारवाई
लॉकडाउनदरम्यान जवळपास १५ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यातील काही जणांचे परवानेच रद्द करण्यात आले तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून यात कसूर झाल्याचे समोर आल्यात त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
प्रमोद सोनोने, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग,नागपूर.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Check the liquor stock of the sellers
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023