Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
इंग्रजीने दिले जगण्याचे बळ अन् ध्येयही!
Aapli Baatmi October 13, 2020

जरगनगर (कोल्हापूर) : रामानंदनगर परिसरातील बालाजी पार्कात राहणारे दिव्यांग महेश देशपांडे आयुष्यभर चढ-उतार पाहूनही आनंदी जीवन जगणारे. त्यांच्या आयुष्यात संघर्ष असला तरी जिद्द कायम आहे. आयुष्यात चालत राहण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषेने बळ दिले आहे. गेली वीस वर्षे ते इंग्रजी व्याकरणाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत.
देशपांडे नववीला असताना कार्यक्रमानिमित्त मामाच्या गावी गेले होते. घराच्या छतावर खेळताना त्यांच्या हातातील लोखंडी काठी विद्युत वाहिनीला लागली. त्यांना तीव्र विजेचा झटका बसला. ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात हलवले. जीव वाचवण्यासाठी गॅंगरीन झालेले हात व पाय शरीरापासून वेगळे करणे गरजेचे होते. हृदयावर दगड ठेऊन आई बाबांनी शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली.
पुढील आठ महिने ते मुंबईमध्ये फिजियो थेरेपीसाठी होते. डॉ. मुकेश दोषी यांनी त्यांना उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना गुडघ्यावर चालण्याचे प्रशिक्षण मिळाले. ते कोल्हापुरात परतले. दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. जिद्दीने अभ्यास सुरू केला. तोंडात लेखणी पकडून त्यांनी लिखाण सुरू ठेवले. त्यांनी 78 टक्के गुण मिळवले. बारावीत त्यांनी वर्गात पहिला क्रमांक पटकावला. पदवी मिळवून ते सरकारी नोकरीच्या शोधात लागले. तीन वर्षांच्या प्रयत्नानंतरही हाती काहीही लागले नाही. त्यांनी घरबसल्या शिकवणी घ्यायला सुरुवात केली. इंग्रजी भाषेत त्यांचा हातखंडा. पाचवीपासून बारावी पर्यंतचे विद्यार्थी येऊ लागले. गेली वीस वर्षे ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
हे पण वाचा – कडक पोलिस बंदोबस्तात कोल्हापूरच्या बांबवडेतील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला
कटुंबीयांनी मोलाची साथ दिली आहे. आई, वडील व भाऊ पाठीशी उभे राहिले आहेत. लॉकडाउनमुळे सहा महिने शिकवणी बंद आहे. त्यामुळे आयुष्यात थोडी उसंत मिळाली आहे. परिस्थिती स्थिर होताच मी माझे काम सुरू करेन.
-महेश देशपांडे
महेश होतकरू आहे. मुलाची अवस्था बघून वाईट वाटते. पण तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभा आहे, याचा आनंद आहे.
– मीना देशपांडे, आई
महेश देशपांडे यांची शिकवण्याची पद्धत निराळी आहे. नववी ते बारावी मी त्यांच्याकडे इंग्रजी शिकलो. ते उत्तम शिक्षक, मार्गदर्शक आहेत.
– निशिकांत बिडवे
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023