Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीसाठी भाजपकडून पांडुरंग कोरे; कॉंग्रेस आघाडीकडून मंगेश चव्हाण
Aapli Baatmi October 13, 2020

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपने मिरजेचे पांडुरंग कोरे यांच्याच नावावर शिक्का मोर्तब केले. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने कॉंग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांची उमेदवारी दाखल केली आहे. सत्ताधारी भाजपचे नऊ आणि कॉंग्रेस आघाडीचे सात सदस्य स्थायीमध्ये असल्याने भाजपचे कोरे यांची निवड निश्चित मानली जात आहे. येत्या बुधवारी ऑनलाईन मतदानाद्वारे निवड होणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसाठी कुपवाडचे सदस्य गजानन मगदूम यांनी जोर लावला होता. त्यांच्यासह मिरजेचे पांडुरंग कोरे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. भाजपच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन्ही नावे पाठवली. त्यावर आज प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पांडुरंग कोरे यांचे नाव स्थायी सभापतीपदासाठी निश्चित केले. त्यानंतर दुपारी भाजपच्या सदस्यांच्या उपस्थितीत श्री. कोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
कुपवाडला आजवर स्थायी समितीसह कुठलेही महत्वाचे पद महापालिकेत मिळालेले नाही. त्यामुळे यावेळी कुपवाडलाच संधी मिळावी यासाठी गजानन मगदूम यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र ते अपक्ष नगरसेवक असून पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. हा मुद्दा चर्चेत आला. शिवाय पुढील वर्षी महापौर पदाची निवड होणार आहे.
खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित आहे. त्यावेळचे राजकारण समोर ठेवून भाजपच्या नेत्यांनी मिरजेला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर समाज कल्याण सभापतीपदासाठी स्नेहल सावंत यांना सलग तिसऱ्यावेळी संधी देण्यात आली. स्नेहल सावंत या कॉंग्रेसच्या काळातही या समितीच्या सभापती होत्या. त्यांना सलग सहाव्या वेळी पद भूषवण्याची संधी मिळणार आहे.
दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज सकाळी सदस्यांची बैठक घेऊन स्थायी समितीसह इतर सर्व समित्यांच्या उमेदवारांची नावे निश्चित केली. स्थायी समिती सभापतीपदासाठी काल (रविवारी) रात्रीच आघाडीच्या नेत्यांनी कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांच्याशी चर्चा केली. श्रीमती पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला. त्याचबरोबर महिला बाल कल्याण आणि प्रभाग समिती एकच्या सभापतीपदासाठी कॉंग्रेस तर उर्वरित तीन प्रभाग समित्या आणि समाजकल्याण सभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार देण्याचे ठरले.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023