Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सभापतींना पक्षादेश बंधनकारक ; राष्ट्रवादी काँग्रेस ठरवेल त्याला बांधील
Aapli Baatmi October 13, 2020

दाभोळ : दापोली पंचायत समितीचे सभापती रउफ हजवानी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश मान्य करावाच लागेल. आजही मी येथे आल्यामुळे ते येथे उपस्थित आहेत. या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करेन, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पक्षाने आदेश देउनही सभापती हजवानी यांनी अद्याप सभापतिपदाचा राजीनामा दिला नाही. ते शिवसेनेच्या जवळ गेले आहेत. याबाबत विचारले असता, ते म्हणाले, हजवानी पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्याने त्यांना पक्षाची कायदेशीर बंधने लागू आहेत. पक्षाचा आदेश ते नक्की पाळतील. पक्ष ठरवेल त्याच्याशी त्यांची बांधिलकी राहील. शिवसेना व राष्ट्रवादी गेली अनेक वर्षे वैचारिक सिद्धांतावर लढत आहेत. मात्र, महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून आता जिल्हा पातळीवर, स्थानिक पातळीवर या तिन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वय कसा होईल, याचा प्रयत्न आम्ही पुढच्या कालावधीत करणार आहोत. तीनही पक्षाच्या लोकप्रतिनिधी तसेच पक्षांचे पदाधिकारी यांना विश्वासात घेत स्थानिक पातळीवर तसेच ग्रामपातळीवर कसे काम करावयाचे, हे ठरवू. दापोली विकास आराखड्यात समाजमंदिरासाठी आरक्षित जागा कुणबी समाजभवन बांधण्यासाठी द्यावी, असा प्रस्ताव दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीने त्याला ना हरकत द्यावी, असे म्हटले होते. ही जागा नगरपंचायतीच्या मालकीची नाही. हा विषय सभेत ठेवण्यास सांगूनही नगराध्यक्षांनी ठेवला नाही, असे आपणास सांगण्यात आले. नगराध्यक्षांना पुढील बैठकीत यावर चर्चा करून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. मात्र, यापूर्वी कुणबी समाजाला ही जागा देण्याचा ठराव झाला आहे.
हे पण वाचा – सणासुदीच्या तोंडावर झाली फसवणूक ; पंचवीस लाख घेऊन भिशीचालक महिला गायब
जिल्हा पातळीवर निर्णय…
जिल्हा पातळीवरील तसेच तालुका पातळीवरील समित्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे असतील, या संदर्भातील निर्णय महाविकास आघाडीच्या संदर्भात जसा राज्य पातळीवर निर्णय घेतला आहे, तसा आता जिल्हा पातळीवर निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कसा समन्वय निर्माण करता येईल, याचा खासदार म्हणून आपण प्रयत्न करू, असे तटकरे यांनी सांगितले.
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023