Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
धार्मिकस्थळे खुली करण्यासाठी भाजपतर्फे औरंगाबाद शहरात मंदिरापुढे होमहवन
Aapli Baatmi October 13, 2020

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात मंदिरे व सर्व प्रकारची धार्मिकस्थळे बंद होती आणि आजही आहेत. मंदिरे आणि धार्मिक स्थळे भाविक भक्तांसाठी खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्यावतीने मंगळवारी (ता.१३) गजानन महाराज मंदिराजवळ होमहवन करण्यात आले. घंटानाद करत लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे मराठवाडा संयोजक संजय जोशी यांच्या नेतृत्वात व भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. गारखेडा परिसरातील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज मंदिराजवळ सकाळी दहा ते दोन या वेळेत हे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी घोषणा देत, उपरोधिक भजने गाऊन, होम हवन करत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच लोककलावंतांनी नृत्य करत घंटानाद केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंदिरे खुली करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज घंटानाद केला. याची दखल घेऊन मंदिरे खुली केली नाहीत तर शांततेच्या मार्गाने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात संजय केणेकर, संजय जोशी यांच्यासह आमदार अतुल सावे, प्रवीण घुगे, राजेश मेहता, भाऊराव देशमुख, बापू घडामोडे, किशोर शितोळे, लक्ष्मीकांत थेटे, अनिल मकरिये, दयाराम बसय्ये, प्रमोद राठोड, समीर राजूरकर, राजू शिंदे, कचरू घोडके, शिवाजी दांडगे,संजय बोराडे, महिला मोर्चाच्या अमृता पालोदकर, साधना सुरडकर, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत आदी सहभागी झाले होते.
संपादन – गणेश पिटेकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023