Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
लष्कराच्या सैन्य दलातील भरतीसाठी हडपसर येथे 'सीईई' परीक्षा
Aapli Baatmi October 13, 2020

पुणे – पुण्यातील सैन्य भर्ती कार्यालयाच्या वतीने सैनिक भरतीसाठी ‘एकत्रित प्रवेश परीक्षा’ (सीईई) ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा हडपसर येथील ‘एआयपीटी’च्या आवारात 1 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली असून यामध्ये जनरल ड्युटी, ट्रेड्समेन (व्यापार) आणि तांत्रिक विभागासाठी ही परीक्षा घेतली जात आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या परीक्षेसाठी पुणे, लातूर, बीड, अहमदनगर व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातील दोन हजार 200 हून अधिक उमेदवार सहभाग घेणार आहेत. या उमेदवारांनी सैन्य भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी व वैद्यकीय परीक्षा हे पहिले दोन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करून सीईई या लेखी परिक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. दरम्यान परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोविड 19 संबंधित मार्गदर्शन तत्वांचे आणि केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करणे तसेच सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचा आदेश सेना भरती कार्यालयातर्फे देण्यात आले आहे.
मुंबई अंधारात गेली की काळजी घेता, उर्वरीत महाराष्ट्राचे काय?
ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रेजिमेंट्समध्ये पाठविले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया मार्च 2021 पर्यंत पूर्ण केली जाईल, असेही कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Edited By – Prashant Patil
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023