Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पुलावरून वाहून जाणाऱ्या चारचाकीतील आठ जण बचावले; मोरगावात अग्रणी नदीवर बचावकार्याचा थरार
Aapli Baatmi October 13, 2020

कवठेमहांकाळ (जि. सांगली ) : पाण्याचा अंदाज न आल्याने अग्रणी नदीवरील पुलावरून पलीकडे जाणारी चारचाकी गाडी पाण्याच्या वेगवान प्रवाहाने नदीपात्रात पडता पडता थोडक्यात बचावली. त्यामुळे गाडीतून प्रवास करणाऱ्या आठ जणांचा जीव वाचला. तर दत्ता प्रमोद साबळे (वय 34, रा. जत) याचा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन नदीत पडल्याने मृत्यू झाला. रविवारी (ता. 11) मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. दरम्यान, वाहून गेलेला तरुणाचा मृतदेह सोमवारी (ता. 12) दुपारी एकच्या सुमारास घटनास्थळापासून जवळच सापडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी संततधार पावसामुळे अग्रणी नदीला या वर्षी तिसऱ्यांदा पूर आला. पुलावरून पाणी वाहत असताना रात्री एकच्या सुमारास जत नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे यांच्यासह आठ जण कोल्हापूरहून देशिंग, मोरगाव, कवठेमहांकाळमार्गे जतकडे मोटरीतून (एमएच 10 बी एम 5412) चालले होते.
मोरगावनजीक आल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीला पाण्याच्या प्रवाहाने ओढ बसू लागली. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे गाडीतील प्रवासी घाबरले. त्यांनी आरडाओरड केल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी तत्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
मोरगावचे सरपंच रमेश काशीद यांच्यासह ग्रामस्थ व पोलिसांनी दोरी व इनरच्या साह्याने गाडीत अडकलेल्या सभापती संतोष ऊर्फ भूपेंद्र कुमार कांबळे (वय 32), चालक जारीक बाबासाहेब अपराज (वय 24), प्रथमेश संजय मुनवर (वय 20), श्रीशैल धनाप्पा कोहळी (वय 35), राहुल शिवाजी वाघमारे (वय 22), सुदर्शन चंद्रकांत कांबळे (वय 21), विकास सीताराम खरात (वय 24), विक्रांत अरुण कांबळे (वय 26, सर्व रा. जत) या आठ जणांना सुखरूप बाहेर काढले. तर दत्ता साबळे हा वाहून गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिस उपाधीक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्यासह पोलिस नाईक सुहास मोहिते, बाबासाहेब व्हटकर, ज्ञानदेव पुणेकर, आमिरशा फकीर, होमगार्ड सागर गोष्टी यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
दैव बलवत्तर म्हणूनच…
गतवर्षी अग्रणी नदीच्या पुलावरून मोरगाव येथील बाप-लेक वाहून गेल्याची घटना घडली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेतील बचावकार्याचा थरार ग्रामस्थांनी अनुभवला. पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असताना मध्यभागी अडकलेल्या गाडीपर्यंत जात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी दोरीने एक-एक करत आठ प्रवाशांना बाहेर काढले. पुलावर असणाऱ्या संरक्षक दगडांचा आधार मिळाल्याने मोटार कशीतरी तग धरून उभी होती. पाण्याचा थोडा जरी प्रवाह वाढला असता तर मोटारीसह सर्व प्रवासी नदीत वाहून गेले असते. केवळ दैव बलवत्तर व वेळेवर मदतकार्य मिळाल्याने आठ जण बचावले.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023