Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी'; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात
Aapli Baatmi October 13, 2020

मुंबई – राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत भाजपने आज सिद्धिविनायक मंदिरासमोर जोरदार आंदोलन केले. राज्यातही ठिकठिकाणी भाजपनेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. सरकार प्रार्थनास्थळे उघडत नसल्याने महाविकास आघाडीवर भाजपकडून कडाडून टीका केली जात आहे. भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत शिवसेनेवर तीव्र शब्दात टीका केली आहे.
कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेत. अयोध्येतील मंदिराचे भूमीपुजन ई पद्धतीने करा असा अनाहूत सल्ला दिला, भारत तेरे तुकडे होण्याची भाषा करणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसची संगत ज्यांनी केली. दहशतवादी याकुब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री केले. पंढरपूरात जाऊन ज्यांनी पांडुरंगाच्या मुर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी? अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत
यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमी पुजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते..
“भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले…त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते..
एवढेच नाही..तर..1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 13, 2020
◆स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली
◆याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले
◆पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही..
हे कसले हिंदुत्वाचे पुजारी?
हे तर सत्तेचे लाचारी! 2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 13, 2020
भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. दारूची दुकाने उघडली, बार रेस्टॉरंट उघडले मग मंदिरे आणि मशिदी बंद का? बार आणि रेस्टॉरंट उघडणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरं बंद ठेवताना लाज वाटत नाही का? अशाही प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे. दरम्यान, आशिष शेलारांनी केलेल्या ट्विटला शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाते. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023