Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पुणे जिल्ह्यात 1341 नवे कोरोना रुग्ण;पुण्यात 486 जण बाधित
Aapli Baatmi October 14, 2020

पुणे – जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 1 हजार 341 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये पुणे शहरातील 486 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत नऊ हजार 180 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आज पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 244, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 530, नगरपालिका क्षेत्रात 63 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 18 नवे रुग्ण सापडले. आज दिवसभरात 46 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील सर्वाधिक 27 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 6, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 10 आणि नगरपालिका क्षेत्रातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही सोमवारी (ता.12) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता. 13) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जिल्ह्यात आज अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख नऊ हजार 193 झाली. यापैकी दोन लाख 74 हजार 967 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, सात हजार 250 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 305 जणांचा समावेश आहे. दरम्यान, आज दिवसभरात तीन हजार 315 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या विविध रुग्णालयांत 14 हजार 762 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त 12 हजार 214 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023