Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कार्पोरेट क्षेत्रातही चाफळच्या चूलवालेबाबांचे मार्केट
Aapli Baatmi October 14, 2020

चाफळ (जि. सातारा) ः पुण्यासारख्या कार्पोरेट शहरात 35 वर्षांपासून ग्रामीण भागातून चुलीची परंपरा कायम ठेवणारे येथील रामचंद्र हणबर यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून चुलीचा आलेला वारसा उच्चशिक्षित होऊनही पुण्यात त्यांनी कायम ठेवला. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतावर अथक ज्ञान प्राप्त करून त्यांनी पारंपरिक चूल ते सुधारित निर्धूर चुलीपर्यंतचा केलेला बदल कालानुरूप लोकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे श्री. हणबर यांची चूलवालेबाबा अशी ओळख निर्माण झाली आहे.
ग्रामीण व निमशहरी महिलांना स्वयंपाकघरात त्यांची चूल उपयोगी पडते आहे. वयाच्या 35 व्या वर्षांपासून त्यांनी चुलीच्या संशोधनात काम केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. 1982 पासून चुलीतील सुधारणा, प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना परंपरेने चुली करणारे कुंभारही चूलवालेबाबा म्हणून ओळखतात.
महाराष्ट्रातील समृद्धी शेडगेची ‘इस्त्रो’त चमक
महिलाही त्यांना सतत भेटून चर्चा करतात. त्यांच्या अनुभवाची शिदोरी त्यांना काम करण्यास ऊर्जा देत राहिली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातही त्यावर चर्चा घडवली आहे. कुंभार व ग्रामीण महिलांमुळे चुलीतील संशोधक होऊन विदेशातही पोचले. राज्यातील अंगणवाडी सेविकांसह अन्य महिला त्यांना चूलवालेबाबा म्हणूनच ओळखतात. श्री. हणबर यांनी 35 वर्षे चुलीच्या संशोधनात काम केले. पारंपरिक चुलीपासून ते सुधारित निर्धूर लक्ष्मी चुलीचा अथक अभ्यास केला. त्यांनी असंख्य चुली तयार केल्या.
“”कुंभारवाड्यात नवीन नमुन्याच्या पाच ते सहा चुली तयार करण्याचे काम सुरू होते. चुली देण्यास तेथे गेलाे. चुलींची बांधणी व सुबकता बघून खूप समाधान झाले. या नमुन्याला कुंभारणीचे लक्ष्मी नाव दिले. शासनाने मान्य केलेली सुधारित लक्ष्मी चूल प्रसारात आहे. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून स्वयंपाकघरात चुलीची निर्मिती करत त्या चुलींना काळानुरूप आधुनिकतेचा आकार देण्याचा प्रयत्न होतो आहे.”
-रामचंद्र हणबर-देशमुख
Edited By : Siddharth Latkar
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chafal Ramchandra Hanbar Deshmukh Invention On Soil Heater Satara News
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023