Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
41 लाख भरले; सांगली महापालिकेने जीएसटी वादावर टाकला पडदा
Aapli Baatmi October 14, 2020

मिरज (जि. सांगली) : “सबका विश्वास’ योजनेत लाभ घेत महापालिकेने 1 कोटी 82 लाख रुपयांची जीएसटीतून माफी मिळवली. यानिमित्ताने बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या करविवादावर पडदा पडला. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रदिर्घ पाठपुरावा करीत 41 लाख रुपयांची करवसुलीही यातून केली.
याबाबतची अधिक माहिती अशी ः केंद्र सरकारने 2007 पासून व्यावसायिक उपयोगासाठी महापालिकेने भाड्याने दिलेल्या जागांच्या व्यवहारावर सेवा कर आकारण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे महापालिकेने 2007 ते 2012 या पाच वर्षात हा सेवा कर भरला नाही. तत्कालीन केंद्रीय सेवा कर विभागाने नोटीस बजावर महापालिकेला थकबाकीसह 85 लाखांचा कर भरणा आणि त्यावरील दंड 26 लाख भरावेत यासाठी नोटीस बजावली.
त्यानंतर महापालिकेने प्रथम सोळा आणि त्यानंतर दहा लाख रुपये भरून याबाबत केंद्रीय लवादासमोर अपील दाखल केले. या अपिलाचाही निकाल महापालिकेच्या विरुद्ध गेला. त्यामुळे महापालिकेवर एक कोटी 96 लाख रुपयांचा भरणा करण्याचे आदेश केंद्रीय लवादाने दिले. यावरही व्याज आकारणी सुरू राहिली. त्यामुळे ही रक्कम सव्वा दोन कोटींवर पोहचली. याकडे पालिकेचे दुर्लक्षच होते.
दरम्यान केंद्रीय सेवा कर विभागाचे केंद्रीय वस्तू सेवा कर विभागात रूपांतर झाले आणि त्यानंतर केंद्र सरकारने थकीत करदात्यांसाठी “सबका विश्वास, विवाद से समाधान’ ही योजना जाहीर केली. या योजनेतून थकित कर विवादांवर कायमचा तोडगा काढण्याचा हेतू होता.
जीएसटी विभागाने महापालिकेने 15 लाख 30 हजार रुपये जमा केले. यापूर्वी जमा केलेले 26 लाख त्यानंतर 15 लाख 30 हजार असे एकूण 41 लाख 30 हजार रुपये भरून हा थकीत कराचा वाद कायमचा मिटवला. वसुलपात्र रक्कम 2 कोटी 25 लाख रकमेतून सुटका करवून घेतली.
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023