Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सोलापुरातील कॉंग्रेस, शिवसेनेचा रुसवा निघणार?, पालकमंत्री भरणे शुक्रवारी घेणार बैठक
Aapli Baatmi October 14, 2020

सोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे जिल्हा पातळीवर व गाव पातळीवर आजही संबंध ताणलेलेच आहेत. राज्याच्या सत्तेतील पक्ष स्थानिक पातळीवर मात्र वारंवार एकामेकांच्या समोर येताना दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री पद दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. पालकमंत्री भरणे आम्हाला विश्वासात घेत नाहीत म्हणून कधी शिवसेनेने तर कधी कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री भरणे शुक्रवारी (ता. 16) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी पहिल्यांदाच अधिकृतपणे महाविकास आघाडी सरकारमधील जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत ते कॉंग्रेस आणि शिवसेनेची नाराजी दुर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या संकटात सोलापूरचे पालकमंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आले. तत्कालिन पालकमंत्री जितेंद्र आव्हाडच कोरोनाबाधित झाल्याने सोलापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपविण्यात आली. सोलापूरचे पालकमंत्री पद भरणे यांना मिळाले आणि सोलापुरात कोरोनाचे संकट तीव्र झाले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या राजकारणाला हात घालायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत असून दुपारी साडेतीन वाजता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या रुसवा निघणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress in Solapur, Shiv Sena’s nervous will leave ?, Guardian Minister will hold a meeting on Friday
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023