Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
जयंतराव... आघाडीधर्म पाळा : आमदार मोहनराव कदम; कॉंग्रेस नेते, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेशामुळे नाराजी
Aapli Baatmi October 14, 2020

सांगली : प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे; मात्र त्याबरोबरच आघाडीधर्माचे तत्त्वही पाळले पाहिजे, असा सल्ला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आमदार मोहनराव कदम यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांना दिला.
विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह नऊ संचालक, तसेच युवक कॉंग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष अजित दुधाळ यांच्यासह काही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
दोन महिन्यांपूर्वी कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेशही अखेरच्या क्षणी बारगळला होता. या साऱ्या राजकीय घडामोडींवर आमदार कदम यांनी पत्रकार बैठकीत नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, “”कॉंग्रेसच्याच लोकांना राष्ट्रवादीत प्रवेश देणे हे धोरण बरोबर नाही. राज्यात महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी घटक पक्ष आहेत. दोन्ही पक्ष गेली दोन दशके आघाडी म्हणून एकत्र आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
कॉंग्रेस हा राष्ट्रवादीचा मित्र पक्ष आहे. आघाडीचे तत्त्व पाळले पाहिजे. आघाडीतील मित्र पक्षाचे कार्यकर्ते, नेते फोडून पक्ष मोठा करण्याचा प्रकार चुकीचा आहे.”
संपादन : युवराज यादव
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023