Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
दंत महाविद्यालयात लागला बोर्ड : रुग्णांनो, ‘आमच्याकडे ना भूल देण्याचे औषध, ना सर्जिकल ब्लेड, ना हातमोजे’
Aapli Baatmi October 15, 2020

नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील दंतचिकित्सकांना एकदा वापरण्यासाठीचे हातमोजे संपल्यामुळे वापरलेले हातमोजे पुन्हा धुऊन इतर रुग्णांवरील प्रक्रियेसाठी वापरण्याची वेळ आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या हातमोजांनी कुणाला संसर्ग झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याशिवाय भूल देण्याचे औषध तसेच सर्जिकल ब्लेड नसल्यामुळे रुग्ण संतप्त होत आहेत. यामुळे रुग्णांच्या माहितीसाठी दंत रुग्णालयात थेट माहिती फलक लावण्यात आला आहे.
राज्यात केवळ तीन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आहेत. येथील काही दंत चिकित्सकांना कोविडच्या कार्यात गुंतवण्यात आले होते. त्यांनी सेवाही दिली. परंतु, येथील मुख शल्यक्रियाशास्त्र विभागात दात काढण्यासह इतर शल्यक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी भूल देण्याचे औषध नसल्याची माहिती फलकावर लावण्यात आली. याशिवाय सर्जिकल ब्लेड संपले असल्याचेही या फलकावर नोंदविण्यात आले. हातमोजे नसल्यामुळे येथील काही दंत चिकित्सकांवर हातमोजे धुऊन वापरण्याची वेळ आली असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हेही वाचा – मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी
विशेष असे की, दंत रुग्णालयातील या विभागाच्या दर्शनी भागात फलकच लावले आला आहे. यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून उपचारासाठी येणाऱ्या दंत रुग्णांची संख्या कमी झाली. परंतु, मुखशल्यक्रिया शास्त्र विभागाची सेवा आकस्मिक विभागातही असते. त्यामुळे या विभागातील सर्व डॉक्टरांनी कोरोनाच्या संकटकाळातही अत्यवस्थ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहेत. रुग्णांना त्रास होऊ नये या भावनेतून हा फलक लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पन्नास रुग्ण मुख्यशल्यशास्त्र विभागात
दंत रुग्णालयात सध्या रोज सुमारे ७० ते १०० रुग्ण येतात. यापैकी ४० ते ५० रुग्णांवर उपचाराचा संबंध मुखशल्यशास्त्र विभागाशी असतो. दात काढण्यासाठी आलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. या विभागात काही महिन्यांपासून हातमोजे, दात कापण्याचे सर्जिकल ब्लेड, भुलीचे औषध उपलब्ध करण्यात आले नाही. त्यामुळे या विभागासमोर दंत प्रशासनाकडून फलक लावत साहित्य संपल्याची सूचना देण्यात आली आहे. हे साहित्य नसल्याने कुणी बाहेरून आणून ते उपलब्ध केल्यास रुग्णावर उपचार केले जातात. परंतु गरीब दारिद्र्य रेषेखाली असलेल्या रुग्णांना साहित्य आणण्याची ऐपत नसते. अशा गरीब रुग्णांना घरचा रस्ता दाखवला जातो. दंत प्रशासनाकडे मागणीसाठी वारंवार स्मरणपत्र दिले जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यासंदर्भात मुखशल्य विभागप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ही दंत रुग्णालयाची अंतर्गत बाब आहे. यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही. मात्र, दंतचे अधिष्ठाता यांना पत्राद्वारे साहित्याची मागणी केली आहे. लवकरच साहित्य उपलब्ध होईल, असे सांगितले.
फलक लावायला नको होता
साहित्य संपले आहे याची माहिती आहे. परंतु, विभागप्रमुखांनी साहित्य संपल्याचा फलकही लावला आहे. त्यांनी असे करायला नको होते. केवळ सेवा देणे आमचे काम आहे. यामुळे नकारात्मक भावना निर्माण होतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरेदीचे आदेश दिले आहेत. त्वरित साहित्य उपलब्ध होईल.
– डॉ. मंगेश फडनाईक,
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
संपादन – नीलेश डाखोरे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023