Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
राज्यात पावसाचा कहर कायम
Aapli Baatmi October 15, 2020

पुणे – कोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्याच्या भागात मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांत अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून सततच्या पावसाने काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. बुधवारीही दिवसभर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोकणात भात शेती धोक्यात
कोकणातील सर्वच जिल्ह्यांच्या बहुतांशी भागांत बुधवारी (ता. १४) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काढणीला आलेले भातपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तुळसणी (ता. देवरूख) येथे विजेच्या धक्क्याने एक महिला मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तसेच मेघी सोलकरवाडी येथे वीज पडल्याने हसम कुटुंबातील दोन जण बेशुद्ध पडले होते.
मध्य महाराष्ट्रात संततधार
नाशिक, पुणे, नगर भागात बऱ्याच भागात जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात गेली तीन दिवस झालेल्या अवेळी पावसामुळे ३३ टक्केहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे तीन हजार ६४० एवढी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसभर जोरदार पाऊस बरसत होता.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विदर्भात कामे खोळंबली
वऱ्हाडात रोज होत असलेल्या पावसामुळे सोंगणी केलेले सोयाबीन पूर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अकोला, बुलडाणा, वाशीमसह सर्वच जिल्ह्यांत ऑगस्टपासून सातत्याने पाऊस पडत आहे. वाशीम जिल्ह्यात मंगरूळपीर, रिसोड, मानोरा, मालेगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सोंगलेल्या सोयाबीनचे संपूर्ण पीक वाया गेले आहे.
मराठवाडा
निलंगा : पाच रस्ते बंद
उमरगा : तालुक्यात ढगफुटी
मांजरा धरण भरण्याच्या मार्गावर
निम्न तेरणा व सीना कोळेगाव धरणाचे चार दरवाजे उघडले
बीड : जिल्ह्यातही पाऊस
पश्चिम महाराष्ट्र, कोकण
कोल्हापूर : पावसाने झोडपले
सोलापूर : भोगावती,नागझरी नदीला महापूर
सातारा : बहुतांश भागात पाऊस
सांगली : सर्वत्र मुसळधार पाऊस
रत्नागिरी : वीज पडल्याच्या घटना
सिंधुदुर्ग : किनारपट्टीवर रेड अलर्ट
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विदर्भ
यवतमाळ : सहस्रकुंड धबधब्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला
गडचिरोली : परतीच्या पावसाची एंट्री
गोंदिया : ओल्या दुष्काळाचे सावट
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023