Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
तासगावला ऐतिहासिक गणपती मंदिरात पाणी; पावसाचा कहर
Aapli Baatmi October 15, 2020

तासगाव (जि. सांगली) ः तासगाव तालुक्यात गेल्या चोवीस तासाहून अधिक काळ पडत असलेल्या पावसाने अक्षरशः कहर केला. गेल्या चोवीस तासात रेकॉर्डब्रेक 86 मिमी पाऊस नोंदविला गेला.
तासगाव शहरासह तालुक्याला बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसाने धुवून काढले. सावळज मनेराजुरी, कवठे एकंद येळावी मांजर्डे, विसापूर यासह बहुतांशी भागात अभूतपूर्व अशा पावसाने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर जनावरे, गाड्या वाहून गेल्याच्या घटना नोंदविल्या गेल्या. तासगाव कराड, तासगाव कवठेमहांकाळ रस्ते काही काल बंद पडले होते.
मणेराजुरी येथे चक्क ताकारी कालव्यात पाणी घुसून कालवा फुटला. राजापूर बोरगाव रस्त्यावरील येरळा नदीपुलाचा भराव वाहून गेला. ग्रामीण भागात द्राक्ष बागा शेतात कमरे इतके पाणी साठल्याचे चित्र दिसत होते. तासगाव शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांना अन्यत्र हलविण्याची वेळ आली.
मध्यवर्ती वाहणाऱ्या ओघळीचे पाणी चक्क गणपती मंदिरात शिरले. शहरातील पालिकेच्या शॉपिंग सेंटर मधील अनेक दुकानांमध्ये दोन दोन फूट पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात पाणीच पाणी सगळीकडे असे चित्र दिसत होते. सकाळी अकरा वाजल्यानंतरही काही प्रमाणात पाऊस पडतच होता.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water at the historic Ganapati temple in Tasgaon;
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023