Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
मिरज-सलगरे राज्यमार्गावरील ओढ्याला आलेल्या पुरात महिला गेली वाहून
Aapli Baatmi October 15, 2020

सांगली : मिरज-सलगरे राज्यमार्गावरील मल्लेवाडी ओढ्याला आलेल्या पुरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जयश्री संजय दुरुरे (वय 40, मल्लेवाडी, दर्गा परिसर) ही महिला वाहून गेली. तिचा पती संजय धनपाल दरुरे (वय 48) व धोंडिराम लालासाहेब शिंदे (वय 62) या दोघांना वाचवण्यात स्थानिक तरुणांना यश आले.
याबाबतची अधिक माहिती अशी
राज्यमार्गावरील हा ओढा कालच्या पावसाने धो धो वाहत आहे. काल रात्री दरुरे दांम्पत्य मालगावला नातलगांतकडे दुचाकीने गेले होते. रात्री ओढ्याला पाणी आल्याने त्यांनी ओढ्याच्या अलीकडेच एकाकडे मुक्काम केला. आज सकाळी ते पुन्हा गावात येण्यासाठी ओढ्याच्या काठावर येऊन बसले होते. तास दोन तास त्यांनी पाणी कमी होईल या आशेने वाट पाहिली. शेवटी पाणी कमी होत नाही म्हणून पाण्यातून जायचा निर्णय घेतला.
पुलावर सुमारे तीन साडेतीन फुट पाणी होते. पाण्याला मोठा वेग असल्याने तीघेही वाहून जाऊ लागले. हा प्रकार ओढ्याच्या पलीकडे असलेल्या निलेश जकाते, लखन करपे, दिपक करपे, सनी जकाते यांनी पाहिला. त्यांनी पाण्यात येत तिघांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. धोंडिराम, संजय यांना वाचवण्यात त्यांना यश आले. जयश्री पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह गावातील यल्लमादेवी मंदिराजवळील झुडपात सापडला.
संपादन – अर्चना बनगे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023