Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
कवठेमहांकाळला तब्बल 40 वर्षांनी अग्रणी नदी पात्राबाहेर....
Aapli Baatmi October 16, 2020

कवठेमहांकाळ : दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरासह तालुक्यातील सर्वच ओढे, बंधारे,तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. तर तब्बल पस्तीस ते चाळीस वर्षानंतर अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नदीला महापूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या असलेल्या द्राक्षबागा पिकांना मोठा फटका बसला. लोणारवाडी येथील तब्बल पंचवीस वर्षानंतर यल्लमा मंदिरात पाणी शिरले होते.कवठेमहांकाळ तालुक्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सलगरे, हिंगणगाव, मोरगाव, देशिंग परिसरातील वाहतूक सायंकाळपर्यंत बंद होती. मोरगाव येथील अग्रणी नदीचा पुल खचल्याचे चित्र आहे.
बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे शहरातील कमंडलू नदी (ओढापात्र)1995 नंतर पहिल्यांदा पुर आला. पुराचे पाणी शहरातील कवठेमहांकाळ – जत रस्त्यावरून वाहत होते.नदीकाठी असलेल्या मंदिरात पाणीच पाणी झाले.शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे ते दिसून येत नाहीत.
तालुक्याच्या पश्चिम विभागातील खरशिंग,देशिंग,हिंगणगाव,मोरगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे हिंगणगाव मोरगाव येथील अग्रणी नदीला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठी असलेल्या द्राक्षबागा आणि अन्य पिकांना मोठा फटका बसला. नदीपात्राचे पाणी बाहेर पडल्याने शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेच्या चिंतेत आहे.काही भागात ऊस भुईसपाट झाला असून काही ठिकाणी माती वाहून जाण्याचे प्रकार समजत आहेत.मोरगाव येथील अग्रणी नदी पात्राबाहेर होत असल्याने नदीवरील असलेला पूल खचू लागला आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 40 years, the Agrani river is out of character ….
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023