Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Video : ...म्हणून गावकऱ्यांनी फेकल्या आमदारावर चपला
Aapli Baatmi October 16, 2020

हैदराबादः तेलंगणामध्ये पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदाराला नागरिकांनी चपला फेकून मारल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ…
तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी 50 हून अधिक नागरिकांचा पावसामुळे मुत्यू झाला आहे. इब्राहिमपट्टनमचे आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना नागरिकांनी त्यांच्यावर चपला फेकून मारल्या. शिवाय, त्यांच्या मोटारीची तोडफोड केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नागरिक चपला फेकून मारताना दिसत आहेत.
#WATCH: Locals hurled slippers at Ibrahimpatnam MLA Manchireddy Kishan Reddy & other TRS workers, during their visit to flood-affected Medipally area, yesterday. The MLA’s vehicle was also vandalised. #Telangana pic.twitter.com/rAZTcSDCcc
— ANI (@ANI) October 16, 2020
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘इब्राहिमपट्टनमचे आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी आणि टीआरएसचे कार्यकर्ते पुराचा फटका बसलेल्या मेडिपल्ली येथे पहाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. नागरिकांनी रागाच्या आमदार आणि त्याच्या समर्थकांना चपला फेकून मारल्या. शिवाय, आमदाराच्या गाडीची तोडफोड केली.’ दरम्यान, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसामुळे घडलेल्या वेगवगेळ्या दुर्घटनांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रेटर हैदराबाद नगर निगम (जीएचएमसी) क्षेत्रामध्ये मृतांचा आकडा 11 पर्यंत गेला आहे. पावसामुळे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023