Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
भूषण कासलीवाल यांचा राजीनामा मंजूर; नगरसेवकांकडून घटनाक्रमाचा खुलासा
Aapli Baatmi October 16, 2020

चांदवड(जि.नाशिक) – चांदवड नगरपरिषद उपनगराध्यक्ष यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष रेखा गवळी यांनी बोलावलेल्या विशेष बैठकीत पुर्वसंध्येला दिलेला राजीनामा गवळी यांनी बैठकीत नगरसेवकांसमोर ठेवल्यानंतर मंजूर करण्यात आला.
अविश्वास प्रस्त्वावाच्या पाठी ‘नो पॉलिटिक्स !’
या बैठकीनंतर उपस्थित सर्वच नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनाक्रमाचा खुलासा केला. यावेळी शिवसेनेचे गटनेते जगन्नाथ राऊत यांनी खुलासा करताना सांगितले की. या अविश्वास प्रस्त्वावाच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. एकोणसाठ महिन्याच्या कार्यकाळात आम्ही सर्वच नगरसेवकांनी भूषण कासलीवाल यांना सहकार्य केले आहे.
हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना
चांदवडचा विकास डोळ्यासमोर निर्णय
मात्र या काळात आम्ही सहकार्य केल्यानंतरही आम्ही मागितलेली माहिती आम्हाला समाधानकारकपणे मिळाली नाही.अनेक विकासकामांचे बाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. याबद्दल नगरसेवकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून फक्त चांदवड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यावर अविश्वास दाखल केला होता.असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023