Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
तासगावकरांनी 50 वर्षात प्रथमच अनुभवला भयानक पाऊस
Aapli Baatmi October 16, 2020

तासगाव : तासगाव तालुक्यात गेल्या चोवीस तासाहून अधिक काळ पडत असलेल्या पावसाने अक्षरशः कहर केला. गेल्या चोवीस तासात रेकॉर्डब्रेक 86 मिमी पाऊस नोंदविला गेला. गेल्या पन्नास वर्षात प्रथमच इतक्या भयानक पाऊस तासगावकरानी अनुभवला.
तासगाव शहरासह तालुक्याला बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसाने धुवून काढले. सावळज मनेराजुरी, कवठेएकंद, येळावी, मांजर्डे, विसापूर यासह बहुतांशी भागात अभूतपूर्व अशा पावसाने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर जनावरे, गाड्या वाहून गेल्याच्या घटना नोंदविल्या गेल्या. रात्रभर पडलेल्या पावसाने घातलेल्या थैमानाचे चित्र सकाळी दिसले. मनेराजुरी तेथे चार जनावरासह गोठा वाहून गेला. मणेराजुरी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. मनेराजुरी, कवठेमहांकाळ, सांगली तासगाव रस्ते गुरुवारी उशीरापर्यंत बंद होते. अनेक द्राक्ष बागांमध्ये गुडघ्यावर पाणी साठले होते. सावळज परिसरात अग्रणी नदीकाठच्या शेतातील घरामध्ये पाणी शिरल्याने भर पावसात अनेकांना घराबाहेर पडावे लागण्याच्या घटना घडल्या.
तासगाव कराड, तासगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, चिंचणी, तासगाव वासुंबे, हे प्रमुख रस्ते काही काल बंद पडले होते. मणेराजुरी येथे चक्क ताकारी कालव्यात पाणी घुसून कालवा फुटला. राजापूर बोरगाव रस्त्यावरील येरळा नदीपुलाचा भराव वाहून गेला. ग्रामीण भागात द्राक्ष बागा शेतात कमरे इतके पाणी साठल्याचे चित्र दिसत होते. सखल भागातील शेतामध्ये पहावे तिकडे पाणीच पाणी असे चित्र दिसत होते.
तासगाव शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांना अन्यत्र हलविण्याची वेळ आली. मध्यवर्ती वाहणाऱ्या ओघळीचे पाणी चक्क गणपती मंदिरात शिरले. शहरातील पालिकेच्या शॉपिंग सेंटर मधील अनेक दुकानांमध्ये दोन दोन फूट पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. शहरातील कापूर ओढ्याला आलेल्या महापूरात काठावरील गोठ्यातील चार म्हैशी पाण्यात बुडून जाग्यावर ठार झाल्या. सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात पाणीच पाणी सगळीकडे असे चित्र दिसत होते . कापूर ओढ्याला आलेले पाणी पहाण्यासाठी सकाळी मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरा वाजल्यानंतरही काही प्रमाणात पाऊस पडतच होता. पावसामुळ सलग दुसऱ्या दिवशी शहरातील सर्व व्यवहार थंडावले होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023